lakhs of devotees in pandharpur on occasion of vaikuntha ekadashi 2023 saam tv
महाराष्ट्र

Covid-19 JN.1 Variant : काळजी घ्या! पंढरीसह शेगावात भाविकांची उसळली अलोट गर्दी, कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटमुळे प्रशासन सतर्क

भाविकांना मार्गदर्शन करण्यास प्रशासनाने प्रारंभ केला आहे.

Siddharth Latkar

- भारत नागणे / संजय जाधव

Pandharpur News :

वैकुंठ एकादशीच्या निमित्ताने (vaikuntha ekadashi 2023) आज (शनिवार) विठ्ठल रुक्मिणीच्या दर्शनासाठी पंढरपूरात लाखो भाविक पंढरीत दाखल झाले आहेत. दरम्यान काेराेनाच्या जेएन.1(Corona JN.1) या नव्या व्हेरियंटच्या पार्श्वभूमीवर पंढरपूरातील (pandharpur) प्रशासन अलर्ट माेडवर आले आहे. भाविकांना (devotees) काळजी घेण्याचे आवाहन प्रशासन करीत आहे. (Maharashtra News)

मार्गशीर्ष महिन्यातील आजच्या एकादशीला वारकरी संप्रदायामध्ये विशेष महत्त्व आहे. यामुळेच वैकुंठ एकादशीच्या निमित्ताने आज सकाळपासूनच विठुरायाच्या दर्शनासाठी भाविकांची पंढरीत मोठी गर्दी दिसून येत आहे.

दरम्यान सध्या राज्यात जेएन. 1 या कोरोनाच्या (Covid-19 JN.1 variant) नवा व्हेरियंटचे रुग्ण आढळून येऊ लागले आहेत. त्यामुळे आराेग्य विभाग दक्ष राहिले आहे. राज्यभरात नव्या कोरोना व्हेरियंटचा प्रसार हाेऊ नये यासाठी काळजी घेतली जाऊ लागली आहे.

या पार्श्वभूमीवर पंढरपूर व सोलापूर जिल्हा प्रशासना देखील अलर्ट झाले आहे. आजच्या एकादशीच्या पार्श्वभूमीवर भाविकांना गर्दीच्या ठिकाणी मास्कचा वापर करा, सामाजिक अंतर ठेवा, स्वच्छता ठेवावी अशा सूचना देण्यात येत आहेत. एकंदरीतच एकादशीच्या निमित्ताने आज पंढरपुरातील भाविकांना मार्गदर्शन करण्यास प्रशासनाने प्रारंभ केला आहे.

सलग सुट्यामुळे शेगांवात भाविकांची वाढली गर्दी

नाताळ (christmas) आणि वर्षाअखेर (New Year) यामुळे आलेल्या सलग सुट्ट्यांमुळे बुलढाणा जिल्ह्यातील तीर्थक्षेत्र असलेला शेगाव (shegaon) तसेच पर्यटनस्थळ असलेला लोणार सरोवर व ऐतिहासिक स्थळ असलेल्या सिंदखेड राजा येथे पर्यटकांची मोठी गर्दी हाेऊ लागली आहे.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

महाराष्ट्रसह मध्य प्रदेश, राजस्थान, छत्तीसगड येथून भाविक शेगावात दाखल हाेऊ लागले आहेत. लाखोंच्या संख्येने शेगावत संत गजानन महाराज (sant gajanan maharaj) भाविकांची गर्दी उसळली आहे. दरम्यान राज्यभरात काेराेनाचे रुग्ण सापडू लागल्याने बुलढाणा जिल्हा प्रशासन किंवा आरोग्य विभागाने अद्याप काेणत्याही मार्गदर्शक सूचना जाहीर केलेल्या नाहीत.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: कल्याणच्या गोविंदवाडी बायपासवरील पुलाची सहा वर्षांत दुरवस्था

Mushroom Masala: अवघ्या काही मिनिटात तयार करा झणझणीत आणि चवदार मशरूम मसाला

ड्रम निळ्या रंगाचाच का असतो?

Lip Care: हायड्रेशनच्या कमीमुळे ओठ काळे पडले आहे का? मग करा 'हे' घरगुती उपाय

Raju Shetti : पंढरपुरात शक्तीपीठ महामार्ग विरोधी दिंडी; राजू शेट्टी यांचे आंदोलन, पांडुरंगाला घातले साकडे

SCROLL FOR NEXT