छत्रपती संभाजीनगर धक्कादायक घटनेनं हादरून गेलं. घरातून निघून गेलेली बहीण घरी परत आल्यानंतर भावानं तिला गोड बोलून डोंगरावर नेलं. तिथून अंदाजे २०० फूट खोल दरीत ढकलून देत तिची हत्या केली. निर्दयी भावाच्या भयंकर कृत्यानं संपूर्ण जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.
मुलगी काही कारणामुळं घर सोडून निघून गेली होती. नंतर ती आपल्या घरी परत आली. तिच्या काकांनी मुलीची समजूत काढण्याचा खूप प्रयत्न केला. पण चुलत भावाच्या मनात तिच्याबद्दल राग होता. त्यानं बहिणीला दरीत ढकलून देत तिची हत्या केली. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील वाळूज परिसरात ही भयंकर घटना घडली.
मिळालेल्या माहितीनुसार, छत्रपती संभाजीनगरच्या वाळूज परिसरात ही भयंकर घटना घडली आहे. घर सोडून निघून गेलेली बहीण परत आल्यानंतर घरच्यांनी तिची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. तिच्या काकांनीही तिला समजावले. पण या गोष्टीचा चुलत भावाच्या मनात राग होता. त्यानं गोड बोलून तिला खवल्या डोंगरावर नेलं. तिथून खोल दरीत तिला ढकलून दिलं. यात तिचा मृत्यू झाला. या प्रकरणी आरोपी चुलत भावाला अटक केली आहे.
हाताला राखी बांधून घेत आयुष्यभर संरक्षणाचं वचन देणाऱ्या भावानंच बहिणीला संपवलं. तिला डोंगरावरून खोल दरीत ढकललं. यात तिचा मृत्यू झालाय. मुलगी मूळची जालना जिल्ह्यातील अंबड तालुक्यातील शहागड येथील रहिवासी होती. काही कारणास्तव ती घर सोडून निघून गेली होती. ती घरी परत आली. घरच्यांनी तिची समजूत काढली. पण मनात प्रचंड चीड असलेल्या भावानं तिची हत्या केली.
घर सोडून निघून गेलेली बहीण पुन्हा घरी आली. तिची समजूत काढण्याचा सगळ्यांनीच प्रयत्न केला. त्यानंतर ती जालन्यातील अंबड तालुक्यातील गावातून ती आपल्या काकाकडे आली. ८ दिवसांपूर्वीच ती काकाच्या वाळदगाव येथील घरी राहायला आली होती. तिथंही तिची समजूत काढण्यात आली. पण काकाच्या मुलाचा म्हणजे तिच्या चुलत भावाच्या मनात राग होता. त्यानं गोड बोलून तिला खवल्या डोंगरावर नेलं. तिथून तिला खोल दरीत ढकलून दिलं. यात तिचा मृत्यू झाला. या घटनेनंतर पोलिसांनी आरोपी भावाला अटक केली आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.