Chhatrapati Sambhajinagar Corona Virus News  Saam TV
महाराष्ट्र

Sambhajinagar News: ‘जेएन.१’ व्हेरिएंटची छत्रपती संभाजीनगरमध्ये एन्ट्री? कोरोनाचे दोन रुग्ण आढळल्याने खळबळ

Chhatrapati Sambhajinagar News: छत्रपती संभाजीनगरमध्ये १० वर्षीय मुलीसह एका महिलेचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. त्यामुळे शहरात एकच खळबळ उडाली आहे.

डॉ. माधव सावरगावे

Chhatrapati Sambhajinagar Corona Virus News

देशासह राज्यात कोरोनाच्या नव्या ‘जेएन.१’ व्हेरिएंटचे रुग्ण आढळून येत असल्याने आरोग्य यंत्रणा चांगलीच सतर्क झाली आहे. राज्यभरात कोरोना तपासणी चाचण्या वाढवण्यात आल्या आहेत. अशातच छत्रपती संभाजीनगरमध्ये १० वर्षीय मुलीसह एका महिलेचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. त्यामुळे शहरात एकच खळबळ उडाली आहे.  ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

कोरोना पॉझिटिव्ह आढळलेले दोन्ही रुग्ण सिडको एन-७ परिसरात (Sambhajinagar News) असल्याची माहिती आहे. प्राप्त माहितीनुसार, गुरुवारी महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाने ६६ जणांचे अहवाल घेतले होते. त्यापैकी २१ जणांची तपासणी करण्यात आली. यामध्ये दोघांचे कोरोना अहवाल पॉझिटिव्ह तर १९ जणांचे अहवाल निगेटिव्ह आलेत.

दरम्यान, कोरोनाबाधित आढळलेल्या मुलीसह महिलेचा अहवाल जिनोम सीक्वेंसिंगसाठी पुण्याला पाठवण्यात आले आहेत. अहवाल प्राप्त झाल्यानंतरच हे रुग्ण नव्या व्हेरीएंटचे आहे की नाही हे स्पष्ट होणार आहे. मात्र, बऱ्याच दिवसानंतर शहरात कोरोनाचे दोन नवे रुग्ण आढळल्याने खळबळ उडाली आहे.  (Latest Marathi News)

कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटची ११ राज्यांमध्ये एन्ट्री

नॅशनल सेंटर फॉर डिसीज कंट्रोलने आरोग्य मंत्रालयाला एक अहवाल सादर केला आहे. यामध्ये कोरोनाचा नवा ‘जेएन.१’ व्हेरिएंट ११ राज्यांमध्ये पसरला असल्याचं सांगण्यात आलं आहे. केरळ, कर्नाटक, तामिळनाडू आणि महाराष्ट्राव्यतिरिक्त गोवा, पुद्दुचेरी, गुजरात, तेलंगणा, पंजाब, दिल्ली आणि राजस्थानमध्येही कोरोना बाधित रुग्ण आढळले आहेत.

JN.1 व्हेरिएंट किती घातक? लक्षणे कसे ओळखाल?

‘जेएन.१’ व्हेरिएंटची लागण झालेल्या रुग्णांमध्ये सुरुवातीला ताप, सर्दी, खोकला, घसादुखी, गॅस्ट्रो, डोकेदुखी यासारखी लक्षणे दिसून येतात. त्यामुळे अशी लक्षणे दिसल्याने नागरिकांनी वेळीच सतर्क होऊन डॉक्टरांचा सल्ला घेणे गरजेचे आहे. जेएन १ व्हेरिएंटचा प्रसार झपाट्याने होत असला तरी, तो किती घातक आहे याबाबत अजूनही ठोस पुरावे मिळाले नाही.

Edited by - Satish Daud

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Exit Poll: तुमसरमध्ये राजू कारेमोरे होणार आमदार? पाहा एक्झिट पोल

महाराष्ट्राचा महानिकाल, निवडणूक निकालाचं हेडक्वार्टर SAAM TV

Maharashtra Election Result : महाराष्ट्र कुणाचा? मतमोजणी कधीपासून आणि कुठे पाहाल?

Maharashtra Exit Polls : शरद पवार गट की अजित पवार गट, पुसदमध्ये कोणाचा उमेदवार जिंकणार? पाहा एक्झिट पोल

Maharashtra Exit Poll: मलकापूरमध्ये राजेश एकडे होणार आमदार? पाहा एक्झिट पोल

SCROLL FOR NEXT