Cordelia Cruz Drug Case
Cordelia Cruz Drug Case saam tv
महाराष्ट्र

Cordelia Cruz Drug Case: आर्यन खानचं नाव शेवटच्या वेळी आरोपींच्या यादीत टाकलं, चौकशी अधिकाऱ्याचा मोठा दावा

Chandrakant Jagtap

>> सचिन गाड, साम टीव्ही

Cordelia Cruz Drug Case: कॉर्डेलिया क्रुझ ड्रग प्रकरणाला आता वेगळं वळण मिळालं आहे. शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान आणि त्याचा मित्र अरबाझ मर्चंट यांची नावे शेवटच्या वेळी आरोपींच्या यादीत टाकण्यात आली असा दावा आयपीएस अधिकारी ज्ञानेश्वर सिंह यांनी प्रतिज्ञापत्रात केला आहे.

कॉर्डेलिया क्रुझ ड्रग प्रकरणात आर्यन खानला अटक करण्यात आली होती. या प्रकरणातील तपासातील त्रुटींची आणि आरोपांची चौकशी ज्ञानेश्वर सिंह करत होते. या प्रकरणाच्या मूळ केस नोटमध्ये बदल करून आर्यन आणि अरबाझ या दोघांची नावे वाढवणात आली, तर काहींची नावे वगळण्यात आली असा दावा देखील सिंह यांच्या प्रतिज्ञापत्रातून करण्यात आला आहे. प्रोसेड्यूरल त्रुटींवर देखील प्रतिज्ञा पत्रात लक्ष वेधण्यात आले आहे.

सीसीटीव्ही फूटेजसोबत छेडछाड

एनसीबीचा साक्षीदार किरण गोसावी याला संधी दिल्याचा देखील प्रतिज्ञापत्रात उल्लेख आहे. गोसावीवर आर्यन खानला अटक न करण्याच्या बदल्यात २५ कोटी रुपयांची खंडणी मागितल्याचा आणि ५० लाख रुपये स्वीकारल्याचा आरोप करण्यात आला आहे. एनसीबीच्या मुंबई कार्यालयातील सीसीटीव्ही फूटेजसोबत छेडछाड केलाचा दावा देखील सिंह यांनी केला आहे. (Breaking News)

पंचनामा न करताच मौल्यवान वस्तू ताब्यात

एवढेच नाही तर एनसीबी अधिकारी रेड दरम्यान पंचनामा न करताच मौल्यवान वस्तू ताब्यात घेत असल्याचेही या प्रतिज्ञापत्रात नमूद करण्यात आल आहे. चौकशीविरोधात समीर वानखेडे यांनी सेंट्रल अॅडमिनिस्ट्रिव्ह ट्रिब्यूनलकडे (central administrative tribunal (CAT)) दाद मागितली असताना सिंह यांनी हे प्रतिज्ञापत्र दाखल केलं होतं. चौकशीअंती वानखेडे यांच्यासह एकूण पाच जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (Latest Political News)

समीर वानखेडेंना सीबीआयचं समन्स

दरम्यान, कॉर्डेलिया क्रुझ ड्रग प्रकरणात अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान याच्या नावाचा समावेश न करण्यासाठी २५ कोटी रुपयांच्या कथित खंडणी मागितल्या प्रकरणी सीबीआयने नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोचे (एनसीबी) माजी अधिकारी समीर वानखेडे यांना गुरुवारी चौकशीसाठी समन्स बजावले. दरम्यान दिल्ली हायकोर्टाने वानखेडे यांच्यावर कारवाई करण्यास पाच दिवसांची स्थगिती दिली आहे. (Latest Marathi News)

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Astro Tips: आपण देवी-देवतांच्या मंदिराला प्रदक्षिणा का मारतो? काय आहे कारण?

Ratnagiri Tourist: उन्हाळ्याची सुट्टी घालवा रत्नागिरीत; 'ही' ७ ठिकाणे आहेत खास

Maval Lok Sabha: मावळचा गड राखण्यासाठी महायुतीचा प्लॅन काय? जाणून घ्या

RCB Vs GT : आरसीबीचा घरच्या मैदानावर मोठा विजय; गुजरातला नमवत ७ व्या क्रमांकावर झेप

KPK Jeyakumar : काँग्रेस नेत्याचा मृतदेह जळालेल्या अवस्थेत सापडल्याने खळबळ; दोन दिवसांपासून होते बेपत्ता

SCROLL FOR NEXT