Ulhas Bapat Saam TV
महाराष्ट्र

Ulhas Bapat: उद्धव ठाकरे पुन्हा मुख्यमंत्री होऊ शकतात; घटनातज्ज्ञ उल्हास बापट यांनी अतिमहत्वाच्या ५ मुद्द्यांवर वेधले लक्ष

Supreme Court Verdict: घटनातज्ज्ञ उल्हास बापट यांनी उद्धव ठाकरे पुन्हा मुख्यमंत्री होऊ शकतात अशी शक्यता वर्तवली आहे.

Dnyaneshwar Choutmal

Ulhas Bapat News: राज्याच्या सत्तासंघर्षासह मुख्यमंत्री पदावर कोण विराजमान होणार याकडे सर्वांचे लक्ष वेधले आहे. अशात घटनातज्ज्ञ उल्हास बापट यांनी मुख्यमंत्री पदावर कोण विराजमान होणार यावर भाष्य केलं आहे. मुख्यमंत्री पदासाठी देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्या नावाची चर्चा होत असतानाच आता घटनातज्ज्ञ उल्हास बापट यांनी उद्धव ठाकरे पुन्हा मुख्यमंत्री होऊ शकतात अशी शक्यता वर्तवली आहे. (Latest Marathi News)

उल्हास बापट यांनी माध्यमांशी संवाद साधताना म्हटलं की, हा खटला इतके दिवस चालू राहणे हेच मुळात चुकीचे आहे. आज निकाल लागत असेल तर आनंदाची गोष्ट आहे. 2/3 लोक एकावेळी बाहेर गेले आणि दुसऱ्या पक्षात विलीन झाले तर ते वाचतात. मात्र 16 जण एकाच वेळी बाहेर पडले पण ते 2/3 होत नाहीत त्यामुळे ते अपात्र ठरतात, असं घटनातज्ज्ञ उल्हास बापट यांनी म्हटलं आहे.

उल्हास बापटांनी यावेळी अनेक शक्यता वर्तवल्या. तसेच काही महत्वाच्या मुद्द्यांवर देखील भाष्य केलं.

घटनातज्ज्ञ उल्हास बापट यांनी मांडलेले ५ महत्वाचे मुद्दे

  1. भारतीय घटनेचा अर्थ लावण्याचे अंतिम अधिकार सर्वोच्च न्यायालयाकडे आहेत. तसेच विधानसभा अध्यक्षांना ते बंधनकारक आहेत.

  2. अपात्र ठरवल्यानंतर कोणी बहुमत सिद्ध करू शकले नाही तर राष्ट्रपती राजवट देखील लागू शकते.

  3. सुप्रीम कोर्ट देखील चुकू शकते सर्वोच्च स्थानी जनता आहे.

  4. आमदार अपात्र ठरल्यानंतर पुन्हा निवडून येईपर्यंत ते अपात्र असतात.

  5. विधानसभा अध्यक्षांकडे हा विषय आला तर त्यांनी त्यावर तात्काळ निर्णय घ्यावा. पळवाटा बंद कराव्यात, १५ दिवसांत निर्णय द्यावा अशी अट न्यायालयाने घालावी.

सर्वोच्चा न्यायालयाच्या निकालावर शिवसेना पक्ष आणि पक्ष चीन्हाचा प्रश्न देखील सुटणार आहे. जर ठाकरेंच्या बाजूने हा निकाल लागला तर पक्ष आणि पक्ष चीन्हासाठी पुन्हा अर्ज करावा लागेल. स्टेटस्को अँटी आदेश दिल्यास उद्धव ठाकरे पुन्हा मुख्यमंत्री होऊ शकतात, असं घटनातज्ज्ञ उल्हास बापट यांनी म्हटलं आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Municipal Election : "आमचं ठरलंय! कमळाऐवजी कपाट चिन्ह..." केडीएमसी निवडणुकीत सोशल मीडियावर खोडसाळ प्रचार, नेमकं प्रकरण काय?

Maharashtra Live News Update : राज ठाकरे उद्या पुणे दौऱ्यावर

Crime: शरीरसंबंध ठेवण्यासाठी खिडकीतून घरात घुसला, विरोध केल्याने सॉफ्टवेअर इंजिनीअरची हत्या

Gold Rate Today: सोनं रेकॉर्डब्रेक महागलं! प्रति तोळा इतकी झाली वाढ, वाचा २२ अन् २४ कॅरेटचे आजचे दर

Weekly Horoscope: या राशींच्या व्यक्तींनी आरोग्याची काळजी घ्यावी, जाणून घ्या राशीभविष्य

SCROLL FOR NEXT