Ujjwal Nikam Statement: सुप्रीम कोर्टाच्या निकालाच्या काही तास आधीच कायदेतज्ज्ञ उज्ज्वल निकमांची महत्वाची प्रतिक्रिया

Ujjwal Nikam Statement Supreme Court Hearing: कायदेतज्ज्ञ उज्ज्वल निकमांनी देखील निकालाच्या अवघ्या काही तासांआधीच महत्वाची प्रतिक्रिया दिली आहे.
Maharashtra Political News
Maharashtra Political NewsSaam TV
Published On

Maharashtra Political Crisis: राज्याच्या सत्तासंघर्षावरील निकाल नेमका काय असणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. अनेक राजकीय जाणकारांनी यावर वेगवेगळ्या शक्यता व्यक्त केल्यात. अशात आता कायदेतज्ज्ञ उज्ज्वल निकमांनी देखील निकालाच्या अवघ्या काही तासांआधीच महत्वाची प्रतिक्रिया दिली आहे. (Latest Marathi News)

उज्ज्वल निकमांनी सत्तासंघार्षावर प्रतिक्रिया देताना दोन प्रमुख मुद्दे मांडले आहेत. राज्यपालांची कृती सर्वोच्च न्यायालय अयोग्य ठरविण्याची दाट शक्यता आहे, असं त्यांनी म्हटलंय.

Maharashtra Political News
Maharashtra Politics News : मविआच्या काळात मंत्रालयात ओल्या पार्ट्या?

राज्यपालांची कृती, विशेष सत्र बोलविण्याचं आणि २६ आमदारांच्या आपात्रेचा विषय असे दोन महत्वाचे मुद्दे आहेत. आमदारांच्या विरोधात अपात्रेचा निर्णय झाला असताना त्यांना अध्यक्षांविरोधात अविश्वास ठराव आणता येतो का, हाही प्रश्न आहे. राज्यपालांची कृती सर्वोच्च न्यायालय अयोग्य ठरविण्याची दाट शक्यता आहे, असं उज्ज्वल निकमांनी म्हटलं आहे.

उद्धव ठाकरेंचा राजीनामा व्हॅलेंट्ररी नव्हता

तत्कालीन मुख्यमंत्र्यांनी दिलेला राजीनामा व्हॅलेंट्ररी नव्हता. राज्यपालांच्या कृतीमुळे दबाव आहे. त्यामुळं राजीनामा असता तर ते इनव्हॅलेंटरी ठरलं असतं. मग नवाम नबिया केसमध्ये जे घडलं त्या निकालानुसार माजी मुख्यमंत्र्यांची पुन्हा मुख्यमंत्री म्हणून नियुक्ती केली असती. 3 जूनला विद्यमान नियुक्ती केली त्यात ठाकरे गटाच्या आमदारांनी विरोधात मतदान केलं होतं, असं उज्ज्वल निकम म्हणाले. (Breaking Marathi News)

Maharashtra Political News
Maharashtra Political Crisis: तब्बल १० महिन्यांनंतर होणार फैसला! जाणून घ्या महाखटल्याच्या सुनावणीमधील महत्वाच्या ५ गोष्टी

'राज्यपालांच्या भूमिकेवर सर्वोच्च न्यायालयाने यापूर्वी सुद्धा सुनावणी तीव्र नापसंती व्यक्त केली होती. राज्यपालांनी कुठल्या पुराव्याच्या आधारावर बहुमत चाचणीवर सरकार अल्पमतात आलं. पण त्यालाही असं उत्तर दिलं होतं की तत्कालीन मुख्यमंत्र्यांनी राजीनामा दिल्याने ती बहुमत चाचणी होऊ शकली नाही, असेही निकम म्हणाले. (Maharashtra Breaking News)

'सरकार अल्पमतात गेलं. त्यानंतर शिंदे गट बहुमत चाचणीमध्ये यशस्वी झालं, पण राज्यपालांच्या कृतीबद्दल सर्वोच्च न्यायालय काय भाष्य करेल हे सांगणे कठीण आहे, असेही निकम पुढे म्हणाले.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com