ओशो आश्रम संपवण्याचे कटकारस्थान; CBI चौकशीची मागणी  SaamTv
महाराष्ट्र

ओशो आश्रम संपवण्याचे कटकारस्थान; CBI चौकशीची मागणी

पुण्यातील कोरेगाव पार्क परिसरातील ओशो आश्रम नष्ट करण्याचे कारस्थान सुरू असून या सर्व प्रकरणाची सीबीआय चौकशी करण्यात यावी अशी मागणी ओशो फॉरेव्हर संघटनेचे अध्यक्ष व चित्रपट लेखक कमलेश पांडे यांनी आज पत्रकार परिषदेत केली आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

पुणे : पुण्यातील कोरेगाव पार्क परिसरातील ओशो आश्रम नष्ट करण्याचे कारस्थान सुरू असून या सर्व प्रकरणाची सीबीआय चौकशी करण्यात यावी अशी मागणी ओशो फॉरेव्हर संघटनेचे अध्यक्ष व चित्रपट लेखक कमलेश पांडे यांनी आज पत्रकार परिषदेत केली आहे.

ओशोंचा वारसा वाचविण्यासाठी संपूर्ण भारतभर जनजागृती मोहीम राबविण्यात येत असून जगभरातील ओशोप्रेमींना त्यांचा पुण्यातील ओशो आश्रम पुन्हा परत प्राप्त होण्यासाठी संघर्ष करावा असे आवाहन देखील पांडे यांनी केले. ओशोंचा वारसा हा केवळ भारतापुरता मर्यादित नसून संपूर्ण जगाचा वारसा असल्याचे प्रतिपादन त्यांनी केले आहे. ओशोंनी भारताच्या हजारो वर्षे जुन्या असलेल्या अध्यात्मिक परंपरेला पुनर्जीवीत अवस्था प्राप्त करून देण्याचे काम केले असून ओशोंची समाधी ओशो संन्यासी व ओशो प्रेमींसाठी काशी किंवा मक्का मदीना या धार्मिक स्थळांएवढीच प्रिय आहे.

हे देखील पहा -

आम्हाला ओशो समाधीपर्यंत जाण्यास बंदी करुन आमच्या धार्मिक अधिकारांपासून वंचित ठेवण्यात येत आहे. ओशोंचा फोटो काढून, त्यांच्या वक्तव्याला काटून छाटून मनमानी पद्धतीने जनतेसमोर सादर केले जात आहे. ओशो यांना एक रहस्यदर्शी सद्गुरु न मानता त्यांना केवळ एका लेखकाच्या स्वरूपात सादर केले जात असून हे कारस्थान यासाठी रचले जात आहे कि, येणाऱ्या पिढीने त्यांना विसरून जावे. ओशोंची जगभरातील वेगवेगळ्या ६० ते ७० भाषांमध्ये अनुवादित झालेली ग्रंथसंपदा या सर्वाची रॉयल्टी कुठे जात आहे? याची चौकशी व्हायला हवी असे देखील ते म्हणाले.

आमची मागणी केवळ ओशोंचा आश्रम विकण्यापासून वाचवण्यात यावा हि नसून या सर्व प्रकाराची सीबीआय व ईडी मार्फत सखोल चौकशी व्हावी अशी असल्याचे कमलेश पांडे यांनी म्हटले आहे. ओशो फाउंडेशन इंटरनॅशनल आणि नवसंन्यास (रजनीश) फाउंडेशनचे ट्रस्टी आणि वर्तमान प्रबंधन टीम द्वारे १८०० कोटी रुपयांचा घोटाळा करण्यात आला असल्याचा आरोप देखील त्यांनी केला. कागदपत्रांची तपासणी आपण वेबसाईटवर सुद्धा करू शकता असे पांडे यांनी म्हटले आहे.

Edited By : Krushnarav Sathe

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: घरकुल योजनेच्या लाभार्थ्यांना १० टक्के मोफत वाळू मिळण्याचा मार्ग मोकळा

अश्लील मेसेज, व्हिडिओ पाठवले अन्..., कोल्हापूरच्या भाजप आमदाराला हनी ट्रॅपमध्ये अडकवलं?

लाडक्या बहीण'साठी आनंदाची बातमी, काही तासात खात्यावर ₹१५०० येणार

Nankhatai Recipe : दिवाळीत लहान मुलांसाठी खास बनवा खुसखुशीत नानकटाई, तोंडात टाकताच विरघळेल

Katrina Kaif Pregnancy : "मुलगा असेल की मुलगी असेल गं?" कतरिना कैफच्या प्रेग्नेंसी बद्दल ज्योतिषांची मोठी भविष्यवाणी

SCROLL FOR NEXT