महाड : महाड शहराला बसलेल्या महापूराच्या फटक्यातून नागरिकांना सावरण्यासाठी अनेक सामाजिक संस्था पुढे येत आहेत. वीस दिवसानंतरही पूरबाधितांसाठी मदतीचा ओघ अद्याप सुरूच आहे. सामाजिक कार्यकर्ते आणि हिरवळ प्रतिष्ठानचे अध्यक्ष किशोर धारिया यांनी पुढाकार घेत सामाजिक बांधिलकीतून महाडकरांना स्वच्छतेसाठी फिनेल तसेच एलएडी ट्यूब आणि बल्बचे मोठ्या प्रमाणात वाटप केले.
हे देखील पहा -
महाड औद्योगिक वसाहतीमधील पिडीलाईट इंडस्ट्रीज ( फेविकॉल ) आणि हिरवळ संस्थेतर्फे महाड शहरातील आठ हजार पूरग्रस्त कुटुंबांना एलईडी बल्ब, ट्यूब लाइट आणि फिनेलचे वाटप करण्यात आले. शहरातील कोटेश्वरी मंदिरात हा कार्यक्रम संपन्न झाला.
महाडच्या प्रांताधिकारी प्रतिमा पुदलवाड यांच्या हस्ते या मदत वाटपाचा अनौपचारिक शुभारंभ करण्यात आला. या प्रसंगी पिडिलाईटचे प्रमुख संजय घवघवे, हिरवळचे अध्यक्ष किशोर धारिया, शेखर गायकवाड, प्रदीप शेठ, संतोष बुटाला, कुणाल गुरव आदि उपस्थित होते.
Edited By : Krushnarav Sathe
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.