Political tensions rise in Maharashtra as Congress and Parth Pawar exchange sharp remarks over the Baramati bypoll. Saam tv
महाराष्ट्र

धड भाषणही देता येत नाही, कुटुंबाच्या पूर्वपुण्याईवर खासदार; काँग्रेसचा नाव न घेता पार्थ पवारांवर सणसणीत पलटवार

Congress vs Parth Pawar Baramati Bypoll Controversy: बारामती पोटनिवडणुकीवरून पार्थ पवार आणि काँग्रेसमध्ये जोरदार वाद रंगला आहे. काँग्रेसने पार्थ पवारांच्या वक्तव्यावर सणसणीत पलटवार करत राजकीय वातावरण तापवलं आहे.

Omkar Sonawane

बारामतीची पोटनिवडणुकीवरून राज्यसभा खासदार पार्थ पवार आणि काँग्रेसमध्ये जोरदार राजकीय घमासान पाहायला मिळत आहे. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांना फोन करून बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा देण्याची मागणी केली होती. मात्र त्यानंतरही काँग्रेसच्या दिल्लीतील हायकमांडने बारामतीच्या पोटनिवडणुकीत उमेदवार रिंगणात उतरवला. यावरूनच पार्थ पवार यांनी काँग्रेसवर जोरदार टीकास्त्र सोडले. याच टीकेला महाराष्ट्र काँग्रेसने ट्विट करत पलटवार केला.

धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुर्वपुण्याईवर आताच खासदार झालेल्या मुलाने काँग्रेस पक्षाच्या डाऊनफॉल बद्दल बोलणं, म्हणजे जरा जास्तच नाही का झालं ? स्वतःच्या वडिलांच्या संशयास्पद अपघाती मृत्यूनंतर लगेच जमीन घोटाळ्यातील चौकशीतून बचावासाठी राजकीय सोय म्हणून शांत राहणाऱ्या, महाशक्तिसमोर सरेंडर झालेल्या या कृतघ्न मुलाने काँग्रेस पक्षाबद्दल न बोललेलंच बरं राहील.

या मुलाच्या वडिलांना न्याय मिळवून देण्यासाठी कर्नाटक सरकारने त्यांच्या राज्यात FIR नोंद करून घेतला, तिथे सरकार काँग्रेस पक्षाचे आहे, काँग्रेस पक्षाचेच बारामती विधानसभा पोटनिवडणूकीतील अधिकृत उमेदवार त्या संशयास्पद अपघाताचा महाराष्ट्रात गुन्हा नोंद करा, निवडणूकीतून माघार घेईल, अशी मागणी करत आहेत. यावरही या कृतघ्न मुलाने बोलायला हवे ? असे महाराष्ट्र काँग्रेसने म्हटले आहे.

पार्थ पवार नेमके काय म्हणाले?

माझे कुणाशी बोलणे झाले नाही. काँग्रेसला त्यांना कळायला पाहिजे काय करायचे ते त्यांच्या राष्ट्रीय काँग्रेसच्या नेतृत्वाबाबत मला नाही माहिती. सगळे मोठे लोक आहेत, सर्वांना माहिती आहे काय चाललेय. त्यांनी विचार केला असेल तर करूद्या. पण त्यांना नंतर काय त्रास होईल महाराष्ट्रात हे त्यांना दिसेल, अशा शब्दात पार्थ पवार यांनी काँग्रेसच्या उमेदवारीबाबत थेट इशाराच दिलाय.

लोक विसरत नाहीत. जे दादांचे प्रेम आहे लोकांच्या मनात अशावेळी एवढ्या समजदार पक्षाने हा निर्णय घेणे, जिथे एवढे मोठे नेते आहेत, अतिशय चुकीचे आहे. मला वाटते की आपण कोणाला थांबवू शकत नाही. जशी वेळ येते तसे समोर जावे लागते. आम्ही सामोरे जाऊ, आम्ही काही कुणाला फोन करणार नाही, जे काही नशिबात लिहिले आहे ते बघू काय व्हायचेय ते, फक्त मला वाईट वाटतेय की कॉँग्रेसचा महाराष्ट्रात डाऊनफॉल आहे असेही पार्थ पवार यांनी म्हटले होते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pune Crime: भररस्त्यात भाजप कार्यकर्त्याची हत्या, ९ गोळ्या झाडत जागीच संपवलं; पुणे हादरले

Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींचे ₹१५०० बंद होणार, ई-केवायसीबाबत सरकारने दिली महत्वाची अपडेट

राज्यातील ५९ RTOऑफिसची १ मेपासून विशेष तपासणी मोहीम; नियम मोडणाऱ्या रिक्षा-टॅक्सी चालकांवर होणार कडक कारवाई

आपच्या खासदारानंतर आता 'या' राज्यातील अख्खा पक्षच भाजपमध्ये विलीन होणार? राजकीय वर्तुळात खळबळ

Weight Loss Foods: डाएटमध्येही खाऊ शकता हे ७ स्ट्रीट फूड, वजनावर काहीच होणार नाही परिणाम

SCROLL FOR NEXT