Vanchit Bahujan Aghadi candidate shortage BMC election saam tv
महाराष्ट्र

Congress Vanchit alliance : 'वंचित'कडून काँग्रेसचा ऐनवेळी घात? महापालिका लढण्यासाठी प्यादेच नसल्याचा धक्कादायक प्रकार

Congress Vanchit alliance crisis in Mumbai : मुंबई महापालिका निवडणुकीत काँग्रेस-वंचित आघाडीला मोठा धक्का बसला आहे. वंचित बहुजन आघाडी उमेदवार देण्यात असमर्थ ठरल्याने काँग्रेसची ऐनवेळी गोची झाली आहे.

Suprim Maskar

Vanchit Bahujan Aghadi candidate shortage BMC election : प्रकाश आंबेडकारांच्या वंचितची काँग्रेससोबत आघाडी झाली... मात्र आघाडीतील जागावाटपानंतर वंचितकडे महापालिका लढण्यासाठी प्यादेच नसल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय...त्यामुळे वंचित बहुजन आघाडीने काँग्रेसची फसवणूक केल्याची भावना कार्यकर्त्यांची आहे. पाहूयात त्यावरचा हा स्पेशल रिपोर्ट....

आठव़ड्याभरापूर्वी काँग्रेससोबतच्या आघाडीवर बोलताना प्रकाश आंबेडकरांनी केलेलं हे विधान नीट ऐका.... मुंबईत 200 जागांवर लढण्याची तयारी असल्याचं सांगणाऱ्या वंचितकडे उमेदवारीची वानवा असल्याचं समोर आलयं... एकीकडे मुंबई महापालिका निवडणुकीसाठी अखेरच्या क्षणी काँग्रेसनं वंचितसोबत आघाडी करून स्वत:ची पाठही थोपटवून घेतली आणि वंचितला मुंबईत तब्बल 62 जागाही दिल्या. मात्र आता वंचितनेच ऐनवेळी घात केला. शेवटच्या क्षणी वंचितनं जागा परत केल्यानं काँग्रेसपुढे चांगलाच पेच निर्माण झाला...

काँग्रेसकडून वंचितला मुंबईत 62 जागा देण्यात आल्या होत्या.. त्यात 62 पैकी तब्बल 21 जागा वंचितनं उमेदवार नसल्यानं काँग्रेसला शेवटच्या क्षणी परत केल्या..त्यानंतर 21 पैकी अवघ्या 5 जागांवरच अखेरच्या क्षणी काँग्रेसकडून उमेदवारी देण्यात आली...उर्वरित 16 जागांवर अधिकृत उमेदवारी अर्ज दाखल केले नाहीत. जागा असूनही उमेदवारी न दिल्यानं, काँग्रेसमधील इच्छुक पदाधिकाऱ्यांनी संताप व्यक्त केलाय

अधिकृत उमेदवार देण्यासाठी मित्रपक्ष असणारी वंचित असमर्थ ठरल्यानं काँग्रेसमध्ये नाराजी पसरलीय.. इच्छुक आणि प्रभावी उमेदवार नसतानाही त्यांनी मतदारसंघ घेतले असं म्हणत काँग्रेस नेत्यानं वंचितला चांगलंच धारेवर धरलयं...जागावाटपाच्या तिढ्यात लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत वंचितनं मविआसोबत आघाडी करण्यास नकार दिला... सन्मानजनक जागांची मागणी करणाऱ्या आंबेडकरांनी काँग्रेसच्या जागावाटपातील मनमानीवरही वारंवार टीका केली...अशातच मुंबई महापालिकेसाठी काँग्रेसनं पक्षातील विरोधाला न जुमानता 62 जागा वंचितला दिल्यानंतरही वंचित उमेदवार देण्यास असमर्थ ठरल्यानं काँग्रेसची ऐनवेळी गोची झालीय... आता मुंबईतील 46 जागांवर वंचित नेमका कोणता करिष्मा करते? हे पाहणं महत्त्वाचं आहे...

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Blouse Latkans Designs: साध्या ब्लाऊजला द्या स्टायलिश लूक, या आहेत सुंदर लटकन्सच्या डिझाईन्स

Maharashtra Live News Update : मनोज जरांगे पाटील आज नाशिक जिल्ह्याच्या दौऱ्यावर

Fry Karanji Recipe : चहासोबत स्नॅक्स म्हणून झटपट बनवा खुसखुशीत फ्राय करंजी, वाचा रेसिपी

Gold Price Today: नववर्षाच्या पहिल्या दिवशी सोन्याच्या दरात वाढ झाली की घसरण? २२ आणि २४ कॅरेटचे आजचे दर किती?

Kidney: थंडीत केलेली १ चूक ठरते किडनी निकामी होण्याचं कारण, डॉक्टारांनी दिली महत्वाची माहिती

SCROLL FOR NEXT