Siddhi Hande
खरवस सर्वांनाच आवडतो. तुम्ही ओल्या नारळाचा खरवस बनवू शकतात.
ओल्या नारळाचे सर्वात आधी दूध काढून घ्यायचे आहे. ओला नारळ वाटून घ्या. त्यानंतर कपड्याच्या साहाय्याने त्याचे दूध काढून घ्या.
खरवस बनवण्यासाठी नारळाचे दूध, गूळ किंवा साखर, कॉर्नफ्लोअर, आरारुट, मीठ, जायफळ
सर्वात आधी नारळाच्या दूधात गूळ किंवा साखर मिक्स करायची आहे.
दूधात कॉर्नफ्लोअर टाका. हे सतत ढवळत राहा. त्याच्या गुठल्या होऊ देऊ नका.
यानंतर मिश्रणात वेलची-जायफळ पूड टाकून मिक्स करा.
हे मिश्रण कुकरच्या डब्ब्यात किंवा स्टीमरमध्ये ठेवून १५-२० मिनिटे वाफवून घ्या.
हा खरवस गार झाल्यावर फ्रीजमध्ये ठेवा.