Nana Patole Mahavikas Aaghadi Rally  SAAM TV
महाराष्ट्र

Nana Patole News: 'आम्हाला फरक पडत नाही, सगळे प्लॅन तयार...' कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचा राष्ट्रवादीला सूचक इशारा?

Maharashtra Politics: गेल्या काही दिवसांपासून राज्यात मुख्यमंत्री पदावरुन दावे प्रतिदावे सुरू आहेत. यावर नाना पटोले यांनी पहिल्यांदा प्रतिक्रिया दिली आहे...

जयश्री मोरे

Mumbai News: राज्याच्या राजकारणात (Maharashtra Politics) सध्या मुख्यमंत्री पदावरुन रोज नवनव्या चर्चा रंगताना पाहायला मिळत आहेत. काही दिवसांपूर्वीच राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते अजित पवार यांनी मुख्यमंत्री होण्याची इच्छा व्यक्त केली होती. त्यावरुन राजकीय चर्चांना ऊत आला होता.

अजित पवार यांच्या याच वक्तव्यानंतर जयंत पाटील यांनीही मुख्यमंत्री राष्ट्रवादीचाच होणार, असा विश्वास व्यक्त केला होता. याच मुद्द्यावरुन कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी प्रतिक्रिया दिली आहे. तसेच "महाराष्ट्रात भाजपच्या विरोधात काँग्रेस हा एकमेव पर्याय आहे," असेही ते यावेळी म्हणाले आहेत. (Latest Marathi News)

काय म्हणाले नाना पटोले...

गेल्या काही दिवसांपासून राज्यात मुख्यमंत्री पदावरुन दावे प्रतिदावे सुरू आहेत. यावर बोलताना नाना पटोले यांनी ठदिवसा कोणाला स्वप्न बघायची असतील तर त्यांना बघू देत, आम्ही काँग्रेस म्हणून महत्वाच्या मुद्द्यांवर सध्या लक्ष देतोय. आता लगेच कुठल्या निवडणुका नाहीयेत, अशी स्पष्ट प्रतिक्रिया दिली आहे. तसेच भाजपच्या विरोधात जो जो आहे तो आमचा मित्र आहे ,म्हणून आम्ही एकजुटीने लढत आहोत," असेही ते यावेळी म्हणाले आहेत.

बाजार समिती निकालावर दिली प्रतिक्रिया..

नुकत्याच झालेल्या बाजार समिती निकालावर बोलताना नाना पटोले यांनी "एपीएमसी असेल किंवा इतर गोष्टी असतील भाजपच्या विरोधात एक जनमत आहे ते स्पष्टपणे दिसून येत आहे, असल्याचे म्हणले आहे. तसेच देशात आणि महाराष्ट्रात भाजपच्या विरोधात काँग्रेस हा एकमेव पर्याय आहे," असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला आहे.

तसेच राष्ट्रवादी कॉंग्रेस भाजपसोबत जाणार असल्याच्या चर्चांवर बोलताना नाना पटोले यांनी "कोण काय करतयं याने आम्हाला काही फरक पडत नाही, कोणी सत्तेसाठी काही निर्णय घेत असतील तर घेऊद्यात आमची भूमिका स्पष्ट आहे. आम्ही त्या पद्धतीने काम करत आहोत," असे स्पष्टिकरण दिले आहे.

दरम्यान, आज मुंबईत होणारी सभा विराट होईल. सभेला मोठ्या प्रमाणात लोक येणार आहेत आणि मित्रपक्षांचेही कार्यकते येणार आहेत. तशी व्यवस्था करण्यात आलेली आहे. आजची सभा ऐतिहासिक होईल, अशी माहिती त्यांनी यावेळी दिली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

GK: शिंकताना डोळे आपोआप का मिटले जातात? जाणून घ्या कारण

Shocking : तलाठ्याचा धक्कादायक प्रताप, पेन्शनच्या फाईलवर सही करण्यासाठी चक्क बियर बारच्या बिलाची मागणी

नगमासोबतच शुभी जोशीला डेट? 'Bigg Boss 19'च्या स्पर्धकावर 'प्रेमात धोका' दिल्याचा आरोप, वाचा नेमकं प्रकरण काय?

Gujarat Fire:काळाकुट्ट धूर, आगीचे उंच लोळ; गुजरातमध्ये कारखान्यात भयंकर आग, काळजाचा ठोका चुकवणारा VIDEO

Maharashtra Live News Update: धाराशिव जिल्ह्यात अनेक ठिकाणी रात्रभर जोरदार पाऊस

SCROLL FOR NEXT