pune news  Saam tv
महाराष्ट्र

Maharashtra Politics : महाराष्ट्रात काँग्रेसला मोठा धक्का, बड्या नेत्याने राहुल गांधींचा 'हात' सोडला; भाजप प्रवेशाची तारीख ठरली

sangram thopte News : महाराष्ट्रात काँग्रेसला मोठा धक्का बसलाय. भोरमधील बड्या नेत्याने काँग्रेसचा 'हात' सोडला आहे. त्यांची भाजप प्रवेशाची तारीखही ठरली आहे.

Vishal Gangurde

सागर आव्हाड, साम टीव्ही

स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीआधीच काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे. पुण्याच्या भोरचे माजी आमदार संग्राम थोपटे यांनी काँग्रेस पक्षाची साथ सोडली आहे. थोपटे हे काँग्रेस पक्षाची साथ सोडल्यानंतर भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. संग्राम थोपटे यांनी आज काँग्रेस पक्ष सोडण्याचं कारणही सांगितलं.

माजी आमदार संग्राम थोपटे यांनी दोन दिवसांपूर्वी काँग्रेसच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिला. थोपटे हे काँग्रेसचा हात सोडून भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याचं निश्चित झालं आहे. येत्या दोन दिवसांत थोपटे भाजपचं कमळ हाती घेणार आहेत. भाजप पक्षप्रवेशापूर्वी थोपटे यांनी साम टीव्हीशी संवाद साधला.

संग्राम थोपटे म्हणाले, 'आम्हाला एकनिष्ठतेचा फळ काँग्रेसने अशा पद्धतीने दिलं. वेळोवेळी तक्रारी करूनही पक्षाने लक्ष दिलं नाही. काँग्रेसकडे एकही असा आश्वासक चेहरा राज्यात नसल्याने आमचे प्रश्न कोण सोडवणार आणि मतदारसंघातील विकास कामे कसे होणार. मी २ दिवसापूर्वी काँग्रेसचा राजीनामा दिला आहे. त्यानंतर राजगड, मुळशी आणि भोरमध्ये कार्यकर्त्यांसोबत बैठक घेतली'.

'तुम्हाला डावलल जातंय, असं कार्यकर्त्यांचं म्हणणं आहे, दुसऱ्या पक्षात जावं लागेल असं कार्यकत्याचं म्हणणं आहे. भाजपमध्ये जावं अशी कार्यकर्त्यांचं म्हणणं आहे. येत्या २२ तारखेला पक्ष प्रवेश होईल. फडणवीस, बावनकुळे आणि इतर नेत्यांच्या उपस्थितीत पक्ष प्रवेश होईल. त्याच्यासोबत अनेक प्रमुख कार्यकर्ते, पदाधिकारी असणार आहेत. काँग्रेस सोडण्याची वेळ काँग्रेसनेचं आणली,असे थोपटे यांनी सांगितलं.

'महाविकास आघाडी सरकार आल्यावर काँग्रेसला १२ मंत्रीपद मिळाली. त्यामध्ये मला संधी मिळेल अशी आशा होती, पण मंत्रिपद मिळालं नाही. त्यानंतर विधानसभा अध्यक्षपद सुद्धा संधी मिळाली नाही. त्यानंतर विरोधी पक्ष नेता पदाची संधीही मला मिळाली नाही. त्यामुळे पक्ष बदलण्याचा निर्णय घेतला पाहिजे अशी कार्यकर्त्यांची इच्छा होती, असे थोपटे म्हणाले.

'मी कोणाच्या दबावाला बळी पडत नाही. महाविकास आघाडीचा धर्म पाळण्यासाठी कामं केलंय.राजगड कारखान्यासाठी आवाज उठवायला पाहिजे होता, पण तसं काही दिसलं नाही. भाजप मोठा पक्ष आहे. विकास कामांना गती मिळेल यासाठी भाजप पक्ष निवडलाय. सलग 3 वेळा निवडून आल्यानंतरही पक्ष पातळीवर हवी तेवढी ताकद मिळालेली नाही. काँग्रेसच्या सर्वच पक्षश्रेष्ठींनी लक्ष दिलं नाही, असा आरोप थोपटे यांनी केला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Strong Bones : हाडांना कमजोर करतात हे 7 अन्नपदार्थ; तज्ज्ञांनी दिला इशारा

Maharashtra Live News Update: अष्टविनायक महामार्गावर कवठे गावाजवळ ट्रक आणि दुध गाडीचा भीषण अपघात, तिघांचा मृत्यू

मुंबईत पोलीस कर्मचाऱ्याची आत्महत्या; राहत्या घरात गळफास घेत आयुष्य संपवलं

Crime : प्रेमा तुझा रंग कसा? एक्स गर्लफ्रेंडला ९ वेळा चाकूने भोसकलं, नंतर बॉयफ्रेंडने स्वत: आयुष्य संपवलं

Mumbai : सतत डोअरबेल वाजवल्याने सटकली, तरुणाने डिलिव्हरी बॉयवर केला गोळीबार; मुंबईत थरार

SCROLL FOR NEXT