Nanded Bypoll Election Result  google
महाराष्ट्र

Nanded Bypoll Election Result 2024: पहिल्या फेरीपासून मागे, शेवटी विजयाची माळ, नांदेडमध्ये रविंद्र चव्हाण यांनी गड राखला

Nanded Bypoll Election Result 2024: महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीबरोबरच नांदेड लोकसभा पोटनिवडणुकीचा निकाल देखील जाहीर झाला आहे.

Dhanshri Shintre

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीबरोबरच नांदेड लोकसभा पोटनिवडणुकीचा निकाल देखील जाहीर झाला आहे. नांदेड लोकसभा मतदारसंघाचे काँग्रेस उमेदवार रवींद्र चव्हाण दिवसभर पिछाडीवर असलेले पाहायला मिळाले. मात्र दिवसभर पिछाडीवर असलेल्या रवींद्र चव्हाण यांनी शेवटच्या काही टप्प्यांत डाव पलटवला. नांदेड लोकसभा मतदारसंघाचे काँग्रेस उमेदवार रवींद्र चव्हाण यांनी १ हजार मतांनी भाजपाच उमेदवार डॉ. संतुक हंबर्डे याचा १४५७ मतांनी पराभव करत विजय मिळवला आहे.

या निवडणुकीत काँग्रेसने वसंतराव चव्हाण यांचे पुत्र रविंद्र चव्हाण यांना उमदेवारी घोषित केली, तर त्यांच्याविरोधात भाजपाने संतुक हंबर्डे यांना निवडणुकीच्या रिंगणात होते. अतिशय अटीतटीची ही लढत होती. या निवडणकीचा निकाल २३ नोव्हेंबर रोजी जाहीर झाला. या निवडणुकीच्या मतमोजणीच्या सुरुवातीच्या टप्प्यात डॉ.संतुक हंबर्डे हे १६ हजार मतांनी पुढे होते त्यामुळे भाजपाचा विजय हा निश्चित मानला जात होता.

मात्र मतमोजणीच्या शेवटच्या टप्प्यात गेम पलटला आणि काँग्रेसने पुन्हा ही जागा आपल्याकडे खेचून आणली, या निकालात रविंद्र चव्हाण यांनी भाजपचे उमेदवार डॉ. संतुक हंबर्डे यांचा १४५७ मताधिक्याने पराभव केला. रविंद्र चव्हाण यांना ५ लाख ८६७८८ मते मिळाली, तर डॉ.संतुक हंबर्डे यांना ५८५३३१ मत मिळाली. रवींद्र चव्हाण यांनी प्रतिक्रिया दिली. मी नांदेडच्या जनतेचे आभार मानतो. स्वर्गीय वसंतराव चव्हाण यांच्या आशीर्वाद आणि जनतेची साथ यामुळे हा माझा विजय आहे असे ते म्हणाले.

या लढतीत काँग्रेसने मोठा विजय मिळवला, परंतु काँग्रेसचा या विजय अशोक चव्हाणांना मोठा धक्का बसला आहे. कारण नांदेड लोकसभा मतदारसंघात काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अशोक चव्हाण यांची मोठी पकड आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांपासून लोकसभेपर्यंत सर्व निवडणुकांमध्ये चव्हाण कुटुंबाचे वर्चस्व आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Updates: शरद पवार कराड विमानतळावर दाखल, निकालावर काय बोलणार शरद पवार?

Sanjay Derkar News : 10 वर्षात मतदारसंघात काम झालं नाही; ठाकरेंचे नवनिर्वाचित आमदार देरकर यांची प्रतिक्रिया

Sharad Pawar : 'आम्ही सत्तेत नसलो तर...'; विधानसभा निवडणुकीच्या निकालावर शरद पवारांची पहिली मोठी प्रतिक्रिया

IPL 2025 Mega Auction Live: 'इंडियन' प्रीमियर लीग! 7 भारतीय खेळाडूंवर लागली 126 कोटींची बोली

IPL Mega Auction: पहिल्यांदाच ऑक्शनमध्ये आला अन् नाद केला! Rishabh वर लागली IPL इतिहासातील सर्वात मोठी बोली

SCROLL FOR NEXT