congress mla suresh warpudkar disqualified from parbhani dcc bank
congress mla suresh warpudkar disqualified from parbhani dcc bank  saam tv
महाराष्ट्र

Parbhani DCC Bank : काॅंग्रेस आमदार सुरेश वरपूडकरांना धक्का, परभणी जिल्हा बॅंक अध्यक्षपद धाेक्यात

राजेश काटकर

Parbhani :

काॅंग्रेस आमदार सुरेश वरपुडकर (suresh warpudkar) यांचे परभणी जिल्हा मध्यवर्ती बँकेचे (parbhani dcc bank) सदस्यत्व अपात्र ठरविण्यात आले आहे. याबाबतचा आदेश विभागीय सहनिबंधकांनी नुकताच काढला आहे. या निर्णयामुळे आमदार सुरेश वरपूडकर यांचे परभणी जिल्हा बँकेचे अध्यक्षपद देखील धाेक्यात आले आहे. (Maharashtra News)

परभणी जिल्हा बँकेची 3 वर्षांपूर्वी निवडणूक झाली होती. जिल्ह्यातील वरपुड विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्था जिल्हा बँकेची थकबाकीदार असल्यामुळे विभागीय सहनिबंधकांनी ऑक्टोबर 2023 मध्ये वरपुडकर यांचे बँकेचे सदस्यत्व अपात्र ठरविले हाेते. या निर्णयाविरुद्ध त्यांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती.

सर्वोच्च न्यायालयाने हे प्रकरण विभागीय सहनिबंधक मुंबई यांच्याकडे साेपविले. त्यानुसार सहकारी संस्था मुंबई विभागाचे विभागीय सहनिबंधक बाजीराव शिंदे यांनी सुरेश वरपुडकर यांच्या अपात्रतेसंबंधी शुक्रवारी आदेश पारित केला. जिल्हा बँकेचे थकबाकीदार असल्याने त्यांचे संचालकत्व अपात्र ठरविल्याचे सांगण्यात आले.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Edited By : Siddharth Latkar

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Federation Cup: ऑलिम्पिकपूर्वी नीरज चोप्राचा धमाका, फेडरेशन कपमध्ये जिंकलं सुवर्णपदक

Maharashtra Politics: प्रफुल्ल पटेलांना जिरेटोप भोवला, टीकेची झोड उठल्यानंतर पटेलांची माघार

Suzuki Jimny चा नवीन 5 डोअर एडिशन लॉन्च, मिळत आहे 1.50 लाखांपर्यंत सूट

Lok Sabha Election: राज ठाकरे आणि नरेंद्र मोदी एकाच मंचावर? शिवाजी पार्कात होणार भव्य प्रचारसभा?

Khatron Ke Khiladi 14: 'खतरों के खिलाडी १४'मध्ये कोण- कोण सेलिब्रिटी दिसणार? पाहा लिस्ट...

SCROLL FOR NEXT