Maharashtra Politics Saam Tv
महाराष्ट्र

Maharashtra Politics: नगरचे राजकारण फिरणार, 'वजनदार' आमदार भाजपच्या वाटेवर

Ahilyanagar Politics: अहिल्यानगरच्या राजकारणातून मोठी बातमी समोर आली आहे. बडा नेता भाजपच्या वाटेवर असून लवकरच पक्ष प्रवेश होणार आहे. त्यामुळे आगामी निवडणुकीत भाजपची ताकद वाढणार आहे.

Priya More

सचिन बनसोडे, अहिल्यानगर

नाशिक पदवीधर मतदारसंघाचे आमदार आणि काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांचे भाचे सत्यजित तांबे यांच्या भाजप प्रवेशाच्या सध्या जोरदार चर्चा सुरू आहेत. लवकरच ते भाजपचे कमळ हाती घेतील असे बोलले जात आहे. त्यातच सुजय विखे यांच्याशी माझे चांगले संबंध असल्याचे भाष्य सत्यजीत तांबे यांनी सकाळ माध्यम समूहाशी बोलताना केले होते. आता भाजपचे माजी खासदार सुजय विखे यांनी याबाबत भाष्य केलं आहे. मैत्री मैत्रीच्या जागेवर आहे मात्र सत्यजित तांबे भाजपात आले तरी स्थानिक पातळीवरचा राजकीय संघर्ष सुरूच राहील असं सुजय विखे यांनी सांगितलं.

सत्यजित तांबे यांच्या भाजप प्रवेशाबाबत होत असलेल्या चर्चावर बोलताना सुजय विखे पाटील यांनी सांगितले की, 'याबाबतीत मुख्यमंत्री आणि भाजपचे वरिष्ठ निर्णय घेतील. कोणाशीही मैत्री ही मैत्रीच्या जागेवर असते. आम्ही देखील भाजपात आलो त्यावेळेस काही लोकांना आवडलं नसेल. मात्र पक्षाने त्यावेळी योग्य तो निर्णय घेतला. त्यामुळे कोणी नवीन येत असेल तर त्याला मी विरोध करणे संयुक्तिक होणार नाही.'

सुजय विखे पाटील यांनी हे देखील स्पष्ट केले की,'संगमनेर तालुक्याच्या महत्त्वाच्या प्रश्नांमध्ये आम्ही मागे हटणार नाही. भविष्यात एका पक्षात असलो तरी स्थानिक राजकारण हे वेगळं असतं ते कायम राहील. कोणी पक्षात आलं किंवा नाही आलं तरी आमच्या पन्नास वर्षात जे राजकारण झालं ते यापुढेही सुरूच राहील. मामा, भाचे, पुतणे कोणीही आलं तरी जनतेच्या हितासाठी आम्हाला जे योग्य वाटतं ते आम्ही करत राहणार.'

सुजय विखे पाटील यांनी यावेळी राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या युतीबाबतच्या चर्चावर देखील प्रतिक्रिया दिली. त्यांनी सांगितले की, 'संजय राऊत यांनी जर हे संकेत दिले तर ते होणारच नाही. दोन वर्षे वाट पहा त्या पक्षात फक्त उद्धवसाहेब आणि संजय राऊत हे दोघेच राहतील. जोपर्यंत संजय राऊत तिथे आहेत तोपर्यंत त्या पक्षात कोणी जाणार नाही आणि पक्षाला उभारीही मिळणार नाही. उद्या युती झाली तर नेतृत्व कोण करणार असे अनेक प्रश्न आहेत. त्यामुळे मला वाटत नाही ही युती होईल आणि जरी झाली तरी महायुती निवडणूक लढायला सक्षम आहे.'

आगामी स्थानिक निवडणुकाबद्दल सुजय विखे पाटील म्हणाले की, 'या निवडणुकांबाबत पक्षाचे नेते आढावा घेतील. काही ठिकाणी महायुतीत लढतील तर काही ठिकाणी मतभेद देखील होऊ शकतात. त्यामुळे हा निर्णय वरिष्ठ पातळीवरून होईल. मात्र तो निर्णय स्थानिक पातळीवर किती पाळला जाईल हा देखील प्रश्न आहे. अनेक वर्षे निवडणुका न झाल्याने अनेक कार्यकर्ते इच्छुक आहेत. त्यामुळे ही एक अग्निपरीक्षाच आहे.'

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Bhiwandi Accident: देवदर्शनावरून घरी परतताना काळाचा घाला; मुंबई-नाशिक महामार्गावर दुचाकीचा अपघात, बापलेकीचा मृत्यू

Leopard Attack: मैत्रीला जागला...! बिबट्याचा कुत्र्यावर हल्ला, श्वानाच्या निडर मैत्रीसमोर बिबट्याची माघार Video Viral

IPS Anjana Krishna: आधी वाद नंतर अजितदादांची स्पष्टीकरणाची पोस्ट; उपमुख्यमंत्र्यांनाच पॉवर दाखवणारी अंजली कृष्णा नेमक्या कोण?

Vanraj Andekar Case: तोच महिना अन् आंदेकर टोळीने नाना पेठेतच आयुषचा गेम केला, पुण्यात रक्तरंजित थरार

HIV: एचआयव्हीच्या रुग्णांनी कोणत्या गोष्टी केल्या पाहिजेत?

SCROLL FOR NEXT