Sujay Vikhe Patil : रोहित पवार, लंकेसोबत ठेकेदारांचे लागेबांधे; सुजय विखे पाटील यांचा जोरदार हल्ला

Ahilyanagar news : अहिल्यानगर जिल्ह्यात जलजीवन योजनांच्या कामाची चौकशी करण्याची करण्याची मागणी खासदार निलेश लंके यांनी केली होती. त्यानुसार जिल्ह्यामध्ये केंद्रीय पथकाने कामाची चौकशी केली
Sujay Vikhe Patil
Sujay Vikhe PatilSaam tv
Published On

सुशील थोरात 

अहिल्यानगर : जलजीवनचे काम ठेकेदार नेमणूकीपर्यत आघाडी सरकारच्या काळात झाली आहेत. येथे काम करणाऱ्या सर्व ठेकेदारांचे आमदार रोहित पवार आणि निलेश लंके यांच्याशी लागेबंधे आहेत. आता सरकार बदलल्यामुळे आरोपाच्या गोष्टी होत आहेत; अशा शब्दात माजी खासदार सुजय विखे पाटील यांनी जोरदार हल्ला केला आहे. 

अहिल्यानगर जिल्ह्यात जलजीवन योजनांच्या कामाची चौकशी करण्याची करण्याची मागणी शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे खासदार निलेश लंके यांनी केली होती. त्यानुसार जिल्ह्यामध्ये केंद्रीय पथकाने कामाची चौकशी देखील केली. मात्र यावर बोलतांना भाजपचे माजी खासदार सुजय विखे पाटील यांनी रोहित पवार आणि निलेश लंके यांच्यावर जोरदार हल्ला चढवला आहे. 

Sujay Vikhe Patil
Tuljabhavani Devi : तुळजाभवानी मातेच्या चरणी भरभरून दान; भाविकांकडून वर्षभरात १७ किलो सोनं, २५६ किलो चांदी अर्पण

जलजीवनचे सर्व कामे ठेकेदारांच्या नेमणूकीपर्यत हे आघाडी सरकारच्या काळात झालेले आहे. कर्जत जामखेडमध्ये सर्व ठेकेदार हे रोहित पवारांचे लागेबंधे असलेले आहेत. तर पारनेरमध्ये देखील माजी आमदार यांचे ठेकेदार आहेत. मात्र आता सरकार बदलल्यामुळे त्यांचे नुकसान झाल्याने या सर्व गोष्टी उभारल्या जातं आहेत. खरंतर वर्क ऑडर निघाल्यानंतर सरकार बदलल्याने यांनी बसविलेल्या लोकांकडून काम करवून घेण्याची नामुष्की आमच्यावर आल्याची टीका सुजय विखे यांनी केली आहे.

Sujay Vikhe Patil
Railway : आता रेल्वेतही काढता येणार एटीएममधून रक्कम; रेल्वे प्रवासादरम्यान सुविधा

सेनेतून बाहेर पाडण्यासाठी खैरे आणि दानवेंचे भांडण

चद्रकांत खैरे आणि आंबादास दानवे यांच्यात वादविवाद सुरु असून खैरे यांनी दानवे यांची मातोश्रीवर तक्रार देखील केली आहे. यावर बोलताना सुजय विखे म्हणाले, की दोघांना सेनेतून बाहेर पडून कुठतरी जायचे असेल. म्हणून हे भांडण करत आहे. तक्रार करून काय उपयोग, मातोश्रीवर ऐकायला तरी कोण आहे. मातोश्रीची आणि संजय राऊतांची कार्यपद्धती बदलली नाही. एवढ्या वर्षात मातोश्रीवर जाऊन काय होणार, त्यामुळे चांगल्या नेतृत्वाकडे जायचे असेल, ते लोक मीडियाच्या माध्यमातून भांडण दाखवत बाहेर पडत असल्याची टीका केली.  

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com