narendra modi & sushilkumar shinde saam tv
महाराष्ट्र

BJP भावना भडकवण्याचे काम करतं; गुजरात फाईल्स काढणार का? सुशीलकुमार शिंदे

काॅंग्रेसचे ज्येष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे यांनी पंजाबचा पराभव हा पक्षातील दुफळीमुळेच झाल्याचं सांगितलं.

विश्वभूषण लिमये

साेलापूर : काश्मीर फाईल्सप्रमाणे पंतप्रधानांनी गुजरात फाईल्सचीही प्रसिध्दी करावी असे मत कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे (sushilkumar shinde) यांनी मांडत पंतप्रधान नरेंद्र माेदी (narendra modi) यांच्यावर निशाणा साधला आहे. साम टीव्हीशी बाेलताना शिंदे म्हणाले मी काश्मीर फाईल्स हा सिनेमा पाहिलेला नाही. अनेक लोक त्याबाबत विविध मते व्यक्त करीत आहेत. जसा काश्मीर फाईल्स (the kashmir files) काढला तसा राणा आय्युब लिखित गुजरात फाईल्सबाबत (gujarat files) विचार व्हावा, त्याची प्रसिद्धी पंतप्रधानांनी करावी. दोन्ही बाजूने बॅलंसिंग करावे अशी अपेक्षा शिंदे यांनी व्यक्त केली. (the kashmir files latest marathi news)

शिंदे म्हणाले झुंड हा एक चांगला चित्रपट आहे. एवढ सुरेख आणि कमी बजेटमध्ये हा चित्रपट काढलाय. नागराज मंजुळे सारख्या लोकांना प्रोत्साहन दिलं पाहिजे. जे प्रस्थापित आहेत त्यांना प्रोत्साहीत करुन काय उपयोग असा सवाल ही त्यांनी केला. ज्या वर्गातून मंजुळे सारखा दिग्दर्शक तयार होतो त्यांना पाठबळ देणे गरजेचे आहे. तो सोलापूरचा (solapur) आहे याचा आम्हाला अभिमान आहे. पण हे त्यांना दिसत नाही त्याच्यावर टीका करतात अशी खंत शिंदेंनी मंजुळेवर हाेत असल्याने व्यक्त केली. दरम्यान मुंबईला गेलो की काश्मीर फाईल्स सिनेमा मी बघणार. त्यात नेमक काय आहे हे मी पाहिले नाही. पण विकृत दाखवणे हे अतिशय चुकीचे आहे. भाजप भावना भडकवण्याचे काम करते. त्यांची व्यूहरचनाच आहे. सत्तेवर असणारे लोक सर्वधर्मसमभाव विसरून गेलेले आहेत. पण आम्ही लोक जे सत्तेवर नाहीत ते अजून टिकवून आहोत. समाजवादी पक्ष, ममता बॅनर्जी अजूनही हे सर्व टिकवून आहेत. भाजपची थोडी चलती आहे. त्यांचा प्रोपगंडा खूप जोरात आहे असेही सुशीलकुमार शिंदेंनी नमूद केले.

दरम्यान पाच राज्यांच्या निवडणुकीच्या निकालावर आणि काॅंग्रेसच्या पराभवावर शिंदे म्हणाले अनेक राज्यात पराभव झालेला असला तरी या पाच राज्यापैकी चार राज्यात पुर्वी भाजपची सत्ता होती. केवळ पंजाबमध्ये आमचा पराभव झाला. पंजाबमध्ये दोन नेत्यांमुळे गडबड झाली आणि आमच्या लोकांच्या निर्णयामुळे त्याचा परिणाम म्हणजे पंजाब (punjab) मधील पराभव हाेय.

लोकांनी धडा देण्याचा प्रयत्न त्याठिकाणी केला आहे. पराभवाबाबत ऑल इंडिया कॉंग्रेसमधील (all india congress) लोक चर्चा करतील. सोनिया गांधींचे (sonia gandhi) व्यक्तीमत्व, नेतृत्वगुण निराळे आहे. त्यांनी कठीण काळात देश सांभाळला आहे. दहा वर्षे सत्तेवर असताना त्यांनी जे नेतृत्व दिले ते देश विसरू शकत नाही असंही शिंदेंनी नमूद केले.

ते म्हणाले तरुणांनी राजकारणात आले पाहिजे. सध्या महाराष्ट्रात तरुण पुढ येत आहेत हे चांगलंच आहे. कॉंग्रेसमधील वैचारिक बैठक बंद झालेली आहे. मात्र आम्ही त्यांना सांगितले आहे, ती आता सुरू होईल. राहुल गांधी (rahul gandhi) यांच्या नावाला माझा कधीही विरोध नाही आणि नव्हता असे एका प्रश्नावर उत्तर देताना सुशिलकुमार शिंदे यांनी स्पष्ट केले.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Kolhapur Politics: मधुरिमाराजेंच्या माघारीची INSIDE STORY; कोल्हापूर उत्तर मतदारसंघात काय घडलं?

Assembly Election: एकनाथ शिंदे आणि राज ठाकरेंमध्ये संघर्ष; शिंदेविरुद्ध दोन ठाकरे

Maharashtra Election: महायुतीनं केलंय काम भारी! लाडक्या बहिणींना मिळणार २१०० रुपये, कोल्हापुरात महायुतीची १० वचनं

Maharashtra News Live Updates: भाजपचा मनसेचे उमेदवार बाळा नांदगावकर यांना पाठिंबा

Uddhav Thackeray: पीएम मोदींच्या अशुभ हातांनी बांधलेला पुतळा पडला'; उद्धव ठाकरेंची टीका

SCROLL FOR NEXT