shashi tharoor  saam tv
महाराष्ट्र

'काही लोक मन की बात ऐकवतात, आम्ही...'; शशी थरूर यांची मोदी सरकारवर जोरदार टीका

काही लोक मन की बात ऐकवितात, आम्ही जन की बात ऐकतो, असं म्हणत शशी थरूर यांनी मोदी सरकारवर निशाणा साधला.

मंगेश मोहिते

shashi tharoor news : 'पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आठ वर्षात जे जाळं विणलं, ते आता लोकांना नको आहे. काही लोक मन की बात ऐकवितात, आम्ही जन की बात ऐकतो, असं म्हणत काँग्रेस खासदार शशी थरूर (Shashi Tharoor) यांनी मोदी सरकारवर (Modi Government) निशाणा साधला.

काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाचे निवडणुकीचे उमेदवार असलेले शशी थरूर यांनी नागपुरात आज कार्यकर्त्यांची बैठक त्यांच्याशी संवाद साधला. त्यावेळी काँग्रेस पक्षाच्या भविष्याबाबत विचार मांडले. तसेच थरूर यांनी मोदी सरकारवर देखील जोरदार टीका केली.

शशी थरूर म्हणाले, 'काँग्रेसचा (Congress) कार्यकर्ता ठरवेल की पक्षाचं भविष्य कोणाच्या हातात असेल. मी अपेक्षा करतो की, पक्षात बदल हवा आहे. त्यासाठी मी निवडणुकीसाठी उभा राहिलो. काँग्रेस जिवंत ठेवण्यासाठी मी उमेदवारी अर्ज भरला. आम्हाला लोकांना त्या लोकांना पुन्हा आणायचं आहे, जे आमच्या सोबत होते. मात्र, काही काळापासून दुसऱ्या पक्षात गेले'.

'आम्ही पक्षात कार्यकर्त्याला शक्तिशाली बनवायचं आहे. आम्हाला सगळ्यांना सोबत घेऊन चालायचं आहे. कारण सर्व भारताचे नागरिक आहेत. मलिकार्जुन खर्गे आणि मी उमदेवार आहे. आम्ही दोघे शत्रू नाही. एकच पक्षाचे आहे. खर्गे हे पक्षातील मोठे नेते आहेत. खर्गे हे काँग्रेस पक्षातील ३ क्रमांकाचे नेते आहेत, असे थरूर म्हणाले. राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेकडे लोक अपेक्षेने पाहत आहे. लोकांना काँग्रेस पाहिजे असे थरूर म्हणाले.

'नरेंद्र मोदींनी आठ वर्षात जे जाळं विणलं, ते आता लोकांना नको आहे. काही लोक मन की बात ऐकवतात, आम्ही जन की बात ऐकतो, असं म्हणत थरूर यांनी मोदी सरकारवर टीका केली आहे. जिल्हा अध्यक्ष बनवायचा असेल तर काँग्रेस अध्यक्ष यांची सही लागते. सर्व गोष्टी काँग्रेस अध्यक्ष ठरविणार हे आता थांबायला पाहिजे, अशी काँग्रेस मला अपेक्षित आहे. काँग्रेस ही युवकांची असली पाहिजे. कारण हा देश युवा स्थितीत आहे, असंही थरूर म्हणाले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: पुण्यातील रेव्ह पार्टी प्रकरण; सर्व आरोपींना दोन दिवसांची पोलीस कोठडी

5G Phones India : कोणत्या स्वस्तात कमी बजेट मध्ये 5G फोन कॅमेरा आणि बॅटरी लाईफ चांगली आहे?

Ambarnath Crime : अंबरनाथमधील हल्ला प्रकरणात धक्कादायक खुलासा; सहा तरुणांविरोधात गुन्हा दाखल

Politics : 'ED-CBIची चौकशी थांबवा; आम्ही भाजपमध्ये येतो...' बड्या खासदाराचा खळबळजनक दावा

Crime: 'एका रात्रीत तीन वेळा...', घरी बोलावून घेतलं, खासदाराकडून २ तरुणांवर बलात्कार

SCROLL FOR NEXT