केंद्रीय मंत्री अमित शाह,मुख्यमंत्री शिंदे ,उपमुख्यमंत्री फडणवीसांच्या विरोधात फेसबुक पोस्ट करणं भोवलं; गुन्हा दाखल

देशाचे गृहमंत्री अमित शाह, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याबद्दल अश्लील आणि आक्षेपार्ह पोस्ट फेसबुकवर केल्याप्रकरणी पुणे सायबर विभागाकडे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
amit shah, eknath shinde and devendra fadnavis
amit shah, eknath shinde and devendra fadnavis saam tv

ज्ञानेश्वर हिंगोलीकर

पुणे : गृहमंत्री अमित शाह (Amit Shah), मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) ,उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या विरोधात आक्षेपार्ह मजकूर फेसबुकवर पोस्ट केल्याप्रकरणी पुण्यात सायबर विभागाकडे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. देशाचे गृहमंत्री अमित शाह, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याबद्दल अश्लील आणि आक्षेपार्ह पोस्ट फेसबुकवर (Facebook) केल्याप्रकरणी पुणे (Pune) सायबर विभागाकडे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (Pune Crime news In Marathi )

amit shah, eknath shinde and devendra fadnavis
'जनतेत जाण्यापासून मला कोणी रोखू शकत नाही'; धमकी मिळाल्यानंतर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया

मिळालेल्या माहितीनुसार, भाजप पुणे शहर सोशल मीडिया अध्यक्ष पदाधिकारी विनित बाजपेयी यांनी रामदास शिर्के यांच्या विरोधात तक्रार दिली आहे. सायबर विभागाच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक एम. पाटील यांनी दिलेल्या माहितीनुसार, रामदास शिर्के या आरोपीने फेसबुकवर हिंदू एकता ग्रुपवर देशाचे गृहमंत्री अमित शाह, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याबद्दल अश्लील आणि आक्षेपार्ह केली आहे, अशी तक्रार भाजप पुणे शहर सोशल मीडिया अध्यक्ष विनित बाजपेयी यांनी केली.

amit shah, eknath shinde and devendra fadnavis
Eknath Shinde News : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या जीवाला धोका; गुप्तचर विभागाला मिळाली माहिती

या तक्रारीनुसार आरोपी रामदास शिर्के याच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. आरोपीचा लवकरात लवकर शोध लागावा. या करिता फेसबुककडे लेखी तक्रार केली असून त्यांच्याकडून आरोपीबाबत माहिती मिळाल्यानंतर पुढील कारवाई केली जाईल, अशी माहिती पोलिसांनी दिली.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com