Nitin Raut injured  Twitter
महाराष्ट्र

Nitin Raut : भारत जोडो यात्रेत नितीन राऊत जखमी; मुलीने ट्विट करत दिली माहिती

माजी मंत्री नितीन राऊत भारत जोडो यात्रेतील धावपळीत जखमी झाल्याची माहिती आहे.

Satish Daud

नागपूर : काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांच्या भारत जोडो यात्रेला सध्या मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळतो आहे. राहुल गांधी यांच्यासोबत काँग्रेसचे (Congress) अनेक दिग्गज नेतेही भारत जोडो यात्रेत सहभागी झाले आहेत. अशातच, महाराष्ट्राचे माजी मंत्री नितीन राऊत भारत जोडो यात्रेतील धावपळीत जखमी झाल्याची माहिती आहे. (Nitin Raut News Today)

नितीन राऊत (Nitin Raut) यांची मुलगी दीक्षा राऊत यांनी ट्विट करत याबाबतची माहिती दिली आहे. काल हैदराबादमध्ये भारत जोडो यात्रेदरम्यान माझे वडील बेशुद्ध झाले. त्यांच्या डोक्याला छोटीशी जखम झाली आहे. मला आशा आहे की ते लवकरच बरे होतील आणि महाराष्ट्रात पोहोचल्यावर जनआंदोलनात सामील होईल. असं दीक्षा राऊत यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे.

काँग्रेस नेते राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रा सध्या हैदराबाद येथे सुरू आहे. या यात्रेत राज्याचे माजी ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत सहभागी झाले, परंतु अफाट गर्दीत झालेल्या धावपळीत ते पडले, यात त्यांच्या कपाळाला जखम झाली असून पायालाही मुका मार लागला.

दरम्यान, नितीन राऊत यांना त्यांच्या कार्यकर्त्यांनी तत्काळ रुग्णालयात दाखल केलं. तेथे त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. ७० वर्षीय राऊत यांच्यावर २०२० मध्ये अ‌ॅन्जियोप्लास्टी झाली असून त्यांची प्रकृती आता ठिक आहे.

राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली काश्मीर ते कन्याकुमारी निघालेली भारत जोडो यात्रेला लोकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. केरळ, तामिळनाडू, कर्नाटक, आंध्र प्रदेश, तेलंगणा या ५ राज्यातून आतापर्यंत ५३ दिवस ही पदयात्रा सुरू आहे. महाराष्ट्रात ७ नोव्हेंबरला या पदयात्रेचा प्रवेश होणार आहे.

Edited By - Satish Daud

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mumbai Heat News : मुंबईकरांना ऑक्टोबर हिटचा तडाखा, पारा 37 अंशावर | VIDEO

Maharashtra Live News Update : अक्कलकोट स्वामी समर्थांचे मंदिर राहणार 20 तास खुले

PM Kisan Yojana: शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी! दिवाळीनंतर पीएम किसान योजनेचा हप्ता येणार; समोर आली अपडेट

Indrayani : इंद्रायणीची घोषणा! दिवाळीच्या शुभ मुहूर्तावर होणार शाळेची पायाभरणी, कोण असणार खास व्यक्ती?

Shocking : धक्कादायक प्रकार! अंगणवाडीच्या खाऊमध्ये आढळला मेलेला उंदीर

SCROLL FOR NEXT