Nana Patole, Balasaheb Thorat saam tv
महाराष्ट्र

Maharashtra Congress News : काँग्रेसमधून दोन भावी मुख्यमंत्री; श्रीरामपूर, अकलूजमध्ये झळकले बॅनर (पाहा व्हिडिओ)

काॅंग्रेसच्या नेत्यांची समाज माध्यमात देखील माेठी चर्चा हाेत आहे.

Siddharth Latkar

- सचिन बनसाेडे / भारत नागणे

Maharashtra Congress News : राज्यात महाविकास आघाडीच्या माध्यमातून असाे अथवा स्वतंत्र आपल्याच पक्षाचा नेता मुख्यमंत्री व्हावा असे मनाेमन महाराष्ट्रातील काॅंग्रेस कार्यकर्त्यांना वाटत आहे. त्यामुळे सध्या गावा गावांत कार्यकर्ते आपल्या नेत्याचा भावी मुख्यमंत्री असा उल्लेख करत माेठे फलक लावत आहेत. (Maharashtra News)

श्रीरामपूर तालुक्यातील बेलापूर गावात काॅंग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थाेरात यांचे भावी मुख्यमंत्री असा उल्लेख करीत बॅनर लावण्यात आले आहेत. या गावात बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat) यांचा दाैरा आहे. त्यांच्या स्वागतासाठी लावलेल्या बॅनरवर भावी मुख्यमंत्री उल्लेख असल्याने जाेरदार चर्चा सुरु आहे.

साेलापूर जिल्ह्यातील अकलूज येथे काॅंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटाेले (Nana Patole) यांचे काॅंग्रेस कार्यकर्त्यांनी बॅनर लावले आहेत. या बॅनरवर पटाेले यांचा भावी मुख्यमंत्री म्हणून उल्लेख करण्यात आला आहे. या बॅनरची चर्चा समाज माध्यमातून देखील माेठ्या प्रमाणात हाेत आहे.

श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीच्या स्वागतासाठी पोस्टर झळकविण्यात आले आहेत. या पोस्टरवर माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष धवलसिंह मोहिते पाटील यांचे देखील फोटो आहेत. अकलूजनगरीसह पालखी सोहळ्यात नाना पटोले यांच्या पोस्टरची जाेरदार चर्चा सुरु आहे.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Exit Poll: नागपूर दक्षिणमध्ये देवेंद्र फडणवीस होणार आमदार? पाहा एक्झिट पोल

Maharashtra Exit Polls : कल्याण ग्रामीणमध्ये मनसेचं इंजिन धावणार का? पाहा एक्झिट पोल

Maharashtra Exit Poll: तुमसरमध्ये राजू कारेमोरे होणार आमदार? पाहा एक्झिट पोल

महाराष्ट्राचा महानिकाल, निवडणूक निकालाचं हेडक्वार्टर SAAM TV

Maharashtra Election Result : महाराष्ट्र कुणाचा? मतमोजणी कधीपासून आणि कुठे पाहाल?

SCROLL FOR NEXT