Pune Nashik Highway Traffic Update : चाकण ते चिंबळी फाटा वाहनांची सहा किलोमीटर रांग, वाहतुक काेंडीने प्रवाशांसह कामगार ,विद्यार्थी त्रस्त; पाेलिसांची दमछाक

सलग सुट्ट्यांमुळे रस्त्यावर वाहनांची वाढली संख्या.
Pune Nashik Highway Traffic Jam
Pune Nashik Highway Traffic Jam saam tv
Published On

Pune Nashik Highway Traffic News : पुणे नाशिक महामार्गावर चाकण औद्योगिक क्षेत्रात आज (शनिवार) सकाळपासून वाहनधारकांना वाहतूक कोंडीने बेजार केले आहे. या महामार्गावर तब्बल पुण्याहून नाशिकच्या दिशेने जाणा-या वाहनांची तब्बल पाच ते सहा किलोमीटर पर्यंत रांग लागली. त्यामुळे एकाच जागी वाहन चालकांना वीस मिनीट थांबावे लागत असल्याचे चित्र हाेते. (Maharashtra News)

Pune Nashik Highway Traffic Jam
Koyna Dam News : पाण्याविना कोयना धरणावरील 1000 मेगावॅट वीज निर्मितीचा चौथा टप्पा बंद

मागच्या अनेक दिवसांपासून चाकण औद्योगिक क्षेत्रातील वाहतुक कोंडी प्रवाशांसह स्थानिक नागरिकांसाठी डोकेदुखी ठरत असताना यामध्ये विकेंडच्या सुट्टीच्या गर्दीची भर पडू लागली आहे. आज सकाळपासुन पुणे नाशिक महामार्गावर चाकण ते चिंबळी फाटा पर्यत माेठी वाहतुक कोंडी झाली आहे. या वाहतुक कोंडीत प्रवाशांसह कामगार ,विद्यार्थी अडकले असुन वाहतुक कोंडी साेडविण्यासाठी पोलीसांची (police) चांगलीच दमछाक होत आहे.

Pune Nashik Highway Traffic Jam
Ashadhi Ekadashi : 120 सीसीटीव्ही कॅमेरेतून पंढरपूरवर ठेवली जातेय नजर, आषाढीसाठी पाेलिस दल सज्ज

चाकण एमआयडीसी (chakan midc) क्षेत्रात होणार वाहतुक कोंडी काढण्यासाठी राजकीय नेत्यांमध्ये मात्र कायमच उदासिनता दिसुन येत आहे. त्यामुळे वाहतुक समस्या नित्याचीच झाली आहे असे काही ग्रामस्थांचे तसेच वाहनधारकांचे म्हणणे आहे.

काही वाहनधारकांनी शनिवार , रविवार सुट्ट्या आल्याने अचानक रस्त्यावर माेठ्या प्रमाणात वाहन आली. त्यामुळे वाहतूक कोंडी माेठ्या प्रमाणात झाल्याचे सांगितले.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com