Yashomati Thakur Saam Tv
महाराष्ट्र

Ladki Bahin Yojana: तृतीयपंथीयांनाही 'लाडकी बहीण योजने'चा लाभ द्या; काँग्रेस नेत्या यशोमती ठाकूर यांची मागणी

Yashomati Thakur Demand To Give Benefit Of Ladki Bahin Yojana To Transgender: काँग्रेस नेत्या यशोमती ठाकूर यांनी तृतीयपंथीयांनाही 'लाडकी बहीण योजने'चा लाभ देण्याची मागणी केलीय. या योजनेचा लाभ तृतीयपंथीयांना देखील दिला जावा, असं त्यांनी म्हटलंय.

Rohini Gudaghe

अमर घटारे, साम टीव्ही अमरावती

राज्यभरातील महिलांना लाभ मिळावा, या हेतुने लोकसभा निवडणुकीनंतर राज्यात मुख्यमंत्र्यांनी 'लाडकी बहीण योजना' सुरू केलीय. 'लाडकी बहीण योजने'चा लाभ तृतीयपंथीयांनाही दिला जावा, अशी मागणी काँग्रेस नेत्या यशोमती ठाकूर यांनी (Congress leader MLA Yashomati Thakur) केल्याचं समोर आलंय. रक्षाबंधनाच्या दिवशी या योजनेचा पहिला हप्ता लाभार्थी महिलांच्या खात्यात जमा होणार असल्याची माहिती राज्याचे अर्थमंत्री आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिलीय.

यशोमती ठाकूर यांची नेमकी मागणी काय?

मुख्यमंत्र्यांची महत्त्वकांक्षी योजनांपैकी एक लाडकी बहीण योजना आहे. या योजनेचा लाभ तृतीयपंथीयांना (Transgender) देण्यात यावा, अशी मागणी काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या आमदार यशोमती ठाकूर यांनी केलीय. महिला धोरण झाल्यानंतर तृतीयपंथीयांचे धोरण होणं सुद्धा गरजेचं होतं. मात्र, ते झालं नाही. आमच्यापर्यंत पोहोचलं देखील नाही. त्यामुळे लाडकी बहीण योजनेचा जो काही लाभ इतर महिलांना मिळत आहे, तोच लाभ तृतीयपंथीयांना सुद्धा मिळावा, अशी भूमिका यशोमती ठाकूर यांनी घेतलीय.

इतर महिलांप्रमाणे तृतीयपंथीयांना योजनेचा लाभ द्या

यशोमती ठाकूर म्हणाल्या की, यासाठी मी सभागृहात आवाज उचलला (Amravati News) होता. मात्र, सरकारकडून अजूनपर्यंत याबाबत कोणतीही सकारात्मक प्रतिक्रिया आलेली नाही. त्यासोबतच एसटी बसमध्ये देखील इतर महिलांप्रमाणे तृतीयपंथीयांना ५० टक्के सूट देण्यात यावी. सरकारने तृतीयपंथीयांकडे लक्ष द्यावं. त्यांचं सुद्धा राहणीमान बदलावं, अशी मागणी आमदार यशोमती ठाकूर यांनी केलीय.

लाडकी बहीण योजना

यशोमती ठाकूर यांनी आता इतर महिलांप्रमाणेच तृतीयपंथीयांना देखील शासनाच्या योजनांचे लाभ मिळावेत, अशी मागणी केलीय. यावेळी त्यांनी लाडकी बहीण योजनेचा लाभ (Ladki Bahin Yojana) तृतीयपंथीयांना देण्याची भूमिका मांडली आहे. आता सरकार यावर काय प्रतिक्रिया देतं? याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे. राज्यभरातून मोठ्या प्रमाणावर या योजनेला प्रतिसाद मिळत आहे. या योजनेंतर्गत लाभार्थी महिलांना दरमहिन्याला १५०० रूपये आर्थिक मदत म्हणून सरकारकडून दिले जाणार आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ajit Pawar Rohit Pawar : अजित पवार विरूद्ध रोहित पवार, दादांचा पुतण्याला दम

Mumbai Dahi Handi 2025 : मुंबईत दहीहंडी उत्सवाला गालबोट; आणखी एका गोविंदाचा मृत्यू

Trump Putin Summit : भारतावरचा टॅरिफ रद्द होणार? ट्रम्प-पुतीन भेटीत काय घडलं?

Mumbai Dahi Handi 2025 : मुंबईत दहीहंडी उत्सवात ७५ गोविंदा जखमी, काहींची प्रकृती गंभीर, एकाचा मृत्यू

Dog Bite: दिसेल त्याचे तोडले लचके;इंदापुरात पिसाळलेल्या कुत्र्याचा धुमाकूळ,सीसीटीव्हीत घटना कैद

SCROLL FOR NEXT