अशोक खरात प्रकरणात काँग्रेस नेत्यांनी गंभीर आरोप केलाय
काँग्रेस नेते सपकाळ यांनी चंद्रकांत पाटील यांच्यावर केला गंभीर आरोप
हर्षवर्धन सपकाळ यांच्या आरोपाने खळबळ
अशोक खरात प्रकरणात नवनवे खुलासे होत आहे. भोंदू खरातकडे उच्चभ्रू, सेलिब्रिटी आणि राजकीय नेत्यांचा राबता होता. महाराष्ट्रातील मंत्रिमंडळातील अनेक मंत्र्यांनी अशोक खरातची भेट घेतली आहे. त्यांच्या भेटीचे व्हिडिओ देखील सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. या फोटोवरून विरोधकांनी सत्ताधाऱ्यांवर जोरदार टीका केली आहे. काँग्रेस नेते हर्षवर्धन सपकाळ यांनी शिंदे गट आणि मंत्री चंद्रकांत पाटील यांच्यावर गंभीर आरोप केला आहे.
'मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पदावरून पायउतार करण्यासाठी अशोक खरातकडे अघोरी पूजा केल्याचा गंभीर आरोप सपकाळ यांनी केला आहे. तसेच चंद्रकांत पाटील यांनी २०१९ साली मुख्यमंत्रिपदासाठी अघोरी पूजा केल्याचा आरोप सपकाळ यांनी केला.
काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी बुलढाण्यात माध्यमांशी संवाद साधला. यावेळी सपकाळ यांनी सत्ताधाऱ्यांवर गंभीर आरोप केला. एकनाथ शिंदे गटाने मुख्यमंत्री फडणवीस यांना पदावरून खाली खेचण्यासाठी पूजा केली. ही संविधानाची पायमल्ली आहे. संविधान अमान्य करून पुन्हा मनुस्मृतीचे दिवस आणायचे. यांचे कटकारस्थान फडणवीस यांचे आहे'.
सपकाळ पुढे म्हणाले, 'काल दोन ट्विट केले होते. एक मुख्यमंत्री होण्यासाठी तर दुसरे मुख्यमंत्री पदावरून खाली खेचण्यासाठी अघोरी पूजा केली होती. एसआयटीला काम करू दिले तर एक डझन मंत्री आणि दोन डझन अधिकारी घरी बसतील. नीती भ्रष्ट आणि अंधश्रद्धेला खतपाणी घालणारे हे सरकार आहे. अजित पवार सारखे दिल्लीला जाऊन पंतप्रधान मोदी, अमित शहा यांना जर भेटले तर मुख्यमंत्र्यांच्या पोटात दुखत होते. पार्थ पवारांचे जमिनीची प्रकरण हे देवेंद्र फडणवीस यांनीच उकरून काढलं. फडणवीस हे खरात प्रकरण आपल्याला सहा महिन्यांपेक्षा अधिक काळ माहिती होते, तर आपण झोपले होते का?'.
'झिरवाळ यांच्या कार्यालयात लाच घेताना जर कर्मचारी सापडला होता. यामुळे आम्ही राजीनाम्याची मागणी केली होती. खरात प्रकरणातील मंत्री असो की झिरवाळ प्रकरणातील सगळ्यांचे राजीनामे झाले पाहिजे, असे सपकाळ यांनी सांगितले.
मुख्यमंत्री फडणवीसांच्या खरात प्रकरणावर निवेदनावर सपकाळ म्हणाले, 'सारवासारव केली असून या प्रकरणाचा राजकीय वापर फडणवीस करत आहे. विरोधकांना गप्प बसवण्यासाठी ते वापरत करत आहे. नाशिकचे पालकमंत्री गिरीश महाजन हे जेम्स बाँड आहे. ते या खरात प्रकरणापासून दूर गेले आहे'.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.