latur Saam tv
महाराष्ट्र

Maharashtra Politics : काँग्रेसला पुन्हा मोठा धक्का; बड्या नेत्यांचा भाजपमध्ये प्रवेश, राजकीय समीकरण बदलणार

Latur Political News : काँग्रेसला पुन्हा मोठा धक्का बसला आहे. लातूरमधील बड्या नेत्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे.

Vishal Gangurde

लातूरमध्ये काँग्रेसला मोठा धक्का बसलाय

माजी बांधकाम सभापती गिरीश पाटील यांनी भाजपमध्ये प्रवेश केला

माजी आमदार बबन खंदारे आणि गणेश हाके यांची भाजपमध्ये घरवापसी

नंदुरबारच्या माजी खासदार हिना गावित यांचाही पुन्हा भाजपमध्ये प्रवेश

या पक्ष प्रवेशामुळे भाजपची ताकद वाढणार

संदिप भोसले, साम टीव्ही

आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय पक्षाने जोरदार तयारी सुरु केली आहे. राज्यातील विविध नगरपरिषदा, जिल्हा परिषदा, महापालिकेचा डोळ्यासमोर ठेवून भाजपकडून पक्षप्रवेश सोहळे सुरु झाले आहेत. नंदूरबारनंतर आता लातूरमध्ये भाजपने मोठा डाव टाकला. काँग्रेसच्या माजी बांधकाम सभापतींना भाजपमध्ये प्रवेश दिला आहे. भाजपच्या या खेळीने जिल्ह्यातील राजकीय समीकरण बदलण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

स्थानिक स्वराज्य संस्थेच्या तोंडावर लातूरमध्ये काँग्रेसला खिंडार पडलं आहे. लातूर मनपाच्या माजी बांधकाम सभापतींनी भाजपमध्ये प्रवेश केला. तसेच माजी आमदार बब्रुवान खंदारे आणि आणि गणेश हाके यांचं निलंबन रद्द करण्यात आलं आहे.

स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका तोंडासमोर ठेवून आज मुंबई येथे भाजपमध्ये मोठ्या प्रमाणात पक्ष प्रवेश करण्यात आलाय. आज नंदूरबारच्या माजी खासदार डॉ. हिना गावित यांनी पुन्हा भाजपमध्ये प्रवेश केला.

लातूर जिल्ह्यातील काँग्रेसचे नगरसेवक तथा माजी बांधकाम सभापती गिरीश पाटील यांनी भाजपात प्रवेश केला आहे. तर विधानसभा निवडणुकीत बंडखोरीचा ठपका ठेवत भाजपाने निलंबित केलेल्या गणेश हाके आणि माजी आमदार बबन खंदारे यांचे देखील निलंबन रद्द करत भाजपने घर वापसी दिली आहे.

या पक्षप्रवेशाने भाजपची ताकद वाढली जाणार आहे. तर लातूर शहरात काँग्रेसला मोठ खिंडार पडलंय. तर येत्या काळात काँग्रेस मधील अनेकांचा प्रवेश भाजपमध्ये होईल, अशी चर्चा शहरात जोर धरू लागली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

CJP ला झटका; शिवाजी पार्कवरच्या आंदोलनाला मुंबई पोलिसांनी परवानगी नाकारली

IND vs WI 1st ODI: विराट कोहलीची शतकीय खेळी; ८ गडी राखून भारताचा वेस्ट इंडिजवर शानदार विजय

किंग कोहलीने इतिहास रचला; ‘विराट’ षटकारासह ‘रन मशिनचे ५५ वे शतक, सचिन तेंडुलकरचे दोन मोठे विक्रम

Maharashtra News Live Update: भामरागडमधून दिलासादायक बातमी; पुराचे पाणी हळूहळू ओसरू लागले

साधेपणाने लग्न केलेल्यांना मुलं झाली नाहीत का? दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर विखेंचं अजब विधान

SCROLL FOR NEXT