Maharashtra rain alert
Maharashtra rain alertSaam tv

Maharashtra Rain Alert : महाराष्ट्रावर पुन्हा संकट; सलग ३ दिवस पाऊस कोसळणार, कोणत्या जिल्ह्यांना फटका बसणार?

Maharashtra rain alert update : महाराष्ट्रावर पुन्हा संकट ओढावलं आहे. राज्यातील काही भागात सलग तीन दिवस पाऊस कोसळण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.
Published on
Summary

महाराष्ट्रात पुढील तीन दिवस मुसळधार पावसाचा अंदाज

मोंथा चक्रीवादळामुळे विदर्भाला ऑरेंज अलर्ट

शेतकऱ्यांना कापूस, तूर आणि भाजीपाल्याच्या पिकांचे नुकसान

धुळे जिल्ह्यात सलग चौथ्या दिवशी पावसाचा कहर

पराग ढोबळे, साम टीव्ही

नागपूर : गेल्या काही दिवसांपासून सुरु असलेल्या पावसामुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान होत आहे. पावसाळा ऋतू संपला तरी राज्यातील विविध भागात पावसाचा कहर सुरु आहे. या अवकाळी पावसाने शेतकऱ्यांची पिके आडवी झाली आहेत. महाराष्ट्रातील बळीराजावरील संकट अद्याप संपलेलं नाही. राज्यातील काही भागात आणखी तीन दिवस मुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे.

हवामान विभाग तज्ज्ञ प्रवीण कुमार यांनी नागपूरसहित विदर्भावर तीव्र अवकाळी पावसाचे संकटाची शक्यता व्यक्त केली आहे. विदर्भात आजपासून पुढील ३ दिवस मुसळधार पावसाची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. यवतमाळ, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया या जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. तर उर्वरित विदर्भातील जिल्ह्यांना जारी करण्यात आला आहे.

बंगालच्या उपसागरात मोंथा चक्री वादळाचा विदर्भाला फटका बसणार आहे. या अवकाळी पावसामुळे शेतकरी अडचणीत सापडणार आहे. शेतात उभे असलेले पीक पावसामुळे झोडपले जाणार आहेत. कापूस, तूर, संत्रा, भाजीपाला उत्पादक शेतकऱ्यांना अवकाळी पावसाचा मोठा फटका बसणार आहे. हवामान विभागाने शेतकऱ्यांसह नागरिकांना सावधानतेचा इशारा दिला आहे.

Maharashtra rain alert
Aaditya Thackeray : वरळीत १९ हजार ३३३ मतदार गडबडीतले आहेत; निवडणुकीच्या तोंडावर आदित्य ठाकरेंनी मोठा बॉम्ब टाकला

मोंथा चक्रीवादळ जसं जसं पुढे सरकत जाईल, तसा तसा त्याचा प्रभाव कमी होत जाईल. विदर्भासह लगतच्या राज्यांनाही मोठा चक्रीवादळाचा फटका बसणार असल्याचं प्रादेशिक हवामान विभागाचे हवामान तज्ज्ञ प्रवीण कुमार यांनी सांगितलं.

Maharashtra rain alert
Bihar Election : निवडणुकीआधी माजी उपमुख्यमंत्र्यांचा दणका; 27 नेत्यांची पक्षातून हकालपट्टी

धुळ्यात पावासाचा कहर

धुळ्यात सलग चौथ्या दिवशी पावसाचा कहर सुरू आहे. हवामान विभागातर्फे धुळे जिल्ह्याला सलग चौथ्या दिवशी देण्यात आला होता. हवामान विभागाच्या अंदाजानुसार सलग चौथ्या दिवशी पावसाने धुळ्यात जोरदार हजेरी लावली. जोरदार पावसामुळे शेती पिकाचं अतोनात नुकसान होण्याची भीती व्यक्त करण्यात आली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com