Maharashtra Politics Saam tv
महाराष्ट्र

Maharashtra Politics : मायावती-प्रकाश आंबेडकर भाजपचे संकटमोचक; महाराष्ट्रात २ पक्षांमुळे मविआने ६ जागा गमावल्या, काँग्रेसने आकडेवारीच दिली

congress on prakash ambedkar : काँग्रेसने बहुजन समाज पक्षाच्या अध्यक्षा मायवती आणि वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांच्यावर टीका केली आहे. तसेच महाराष्ट्रात दोन पक्षामुळे ६ जागा गमावल्या, असा दावा केला आहे.

Vishal Gangurde

मुंबई : लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला मोठं यश मिळालं. राज्यात महाविकास आघाडीने ३० जागा जिंकल्या. तर राज्यात एका जागा अपक्षाला मिळाली. त्यानंतर अपक्ष खासदार विशाल पाटील यांनीही काँग्रेसला पाठिंबा दिला. या निवडणुकीत महायुतीला १७ जागांवर समाधान मानावं लागले. या निवडणुकीनंतर प्रकाश आंबेडकरांनी आमच्यामुळे भाजपच्या १८ जागा पडल्या, असं म्हटलं. दुसरीकडे काँग्रेसने आकडेवारी देत राज्यात दोन पक्षांमुळे भाजपने ६ जागा जिंकल्या दावा केला आहे. यामुळे काँग्रेस आणि वंचित बहुजन आघाडीत पुन्हा आरोप-प्रत्यारोप सुरु झाले आहेत.

काँग्रेस प्रवक्त्या सुप्रिया श्रीनेत यांनी 'एक्स'वर पोस्ट करत लोकसभा निवडणुकीच्या निकालावर भाष्य केलं. यावेळी काँग्रेस प्रवक्त्या सुप्रिया यांनी लोकसभा निवडणुकीच्या निकालावरून बहुजन समाज पक्ष आणि वंचित बहुजन आघाडीवर टीका केली. 'उत्तर प्रदेशात मायावती भाजपच्या संकटमोच आहेत. तर महाराष्ट्रात प्रकाश आंबेडकर आणि असदुद्दीन ओवेसी भाजपचे संकटमोचक आहेत', अशी टीका काँग्रेस प्रवक्त्या सुप्रिया श्रीनेत यांनी केली.

'महाराष्ट्रात दोन पक्षांमुळे भाजपने ६ जिंकल्या. या मिळालेल्या मतांमुळे काँग्रेसने एक तर ठाकरे गटाने ६ जागा गमावल्या. या दोघांनी मतविभाजन केलं नसतं, तर महाराष्ट्रात ४८ पैकी ३७ जागा महाविकास आघाडीने जिंकल्या असत्या,असा दावा सुप्रिया यांनी केला. यावेळी सुप्रिया श्रीनेत यांनी मतांच्या आकडेवारीचा एक्सल चार्ट देखील शेअर केला. या आकडेवारीत राज्यातील अकोला, औरंगाबाद, बुलढाणा, हातकंगणले, वायव्य मुंबई, पालघर या लोकसभा मतदारसंघांचा समावेश आहे.

प्रकाश आंबेडकर काय म्हणाले होते?

एका मुलाखतीत प्रकाश आंबेडकरांनी दावा होता की, 'राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे विश्लेषण तुम्ही वाचले नाही. खरंतर वंचित बहुजन आघाडीमुळे भाजपच्या १८ जागा पडल्या. ओबीसीतील मूळ मतदार आमच्याकडे असून तो आमच्याकडे तसाच राहिला. आमच्याजवळचा मतदार गेला, कारण आम्ही आक्रमकपणे प्रचार केला नाही'.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Exit Poll: तिरोडामध्ये रविकांत बोपचे होणार आमदार? पाहा एक्झिट पोल

Winter Foods: हिवाळ्यात भारतातील या ठिकाणांना भेट देण्याचा विचार करत आहात का? 'हे' पदार्थ नक्की खाऊन बघा..

Samosa Recipe: घरच्या घरी नाश्त्याला बनवा खुसखुशीत समोसा; बाहेरचे तेलकट पदार्थ खाणे द्याल सोडून

Maharashtra Politcs : निकालाच्या आदल्या दिवशी भाजपला मोठा धक्का; मुंबईतील बड्या नेत्याने हाती धरली उद्धव ठाकरेंची मशाल

Night Jasmine: घराच्या बागेत लावा पारिजातकाचं झाड, मनमोहक सुगंधाने बहरेल तुमची बाग

SCROLL FOR NEXT