Nagpur Chamunda Company Blast: मंत्र्यांचे नातेवाईक हप्ता वसुली करतात; विजय वडेट्टीवार आक्रमक, महायुती सरकारवर गंभीर आरोप

Opposition Leader Vijay Wadettiwar Criticized Goverment: नागपूरमध्ये स्फोटके बनवणाऱ्या कंपनीत झालेल्या दुर्घटनास्थळी विजय वडेट्टीवार यांनी भेट दिली आहे. दुर्घटनेवरून त्यांनी सरकारवर टीका केली आहे.
विजय वडेट्टीवार
Vijay WadettiwarSaam Tv

पराग ढोबळे, साम टीव्ही नागपूर

नागपूरजवळील धामणा येथील स्फोटके बनवणाऱ्या चामुंडी कंपनीत झालेल्या दुर्घटनास्थळी विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी भेट दिली आहे. यावेळी काँग्रेस नेते सुनील केदार आणि रामटेकचे खासदार श्यामकुमार बर्वे उपस्थित होते. घटनास्थळाची पाहणी करून स्फोटाचे नेमके कारणे काय, यासंदर्भात चर्चा केल्याची माहिती मिळतेय. याघटनेवरून विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी सरकारवर निशाणा साधला आहे.

नागपूर धामणा येथील घटनेमध्ये मृतकांच्या कुटुंबीयांना तात्काळ २५ लाख रुपयांचा चेक मालकाकडून मिळावा. त्याशिवाय मृतदेह उचलले जाणार नाही, असं वडेट्टीवार यांनी सांगितलं (Nagpur Chamunda Company Blast) आहे. या कंपन्यांमध्ये दर महिन्याला विझिट करून सुरक्षेची व्यवस्था केली जाते की नाही, याची पाहणी करणे गरजेचे होतं. मात्र, याकडे संबंधित विभागाने साफ दुर्लक्ष केलेलं आहे.

कुठलाही प्रशिक्षण न देता मजुरांकडून काम केलं जात होतं, तेही अवघ्या मोजक्या दरात असा आरोप विजय वडेट्टीवार यांनी केला आहे. या सगळ्या प्रकरणाची गंभिरपणे चौकशी केली पाहिजे. संबंधितांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल झाला पाहिजे. यात मंत्र्यांचे नातेवाईक नागपुरात हप्ता वसुली करतात, असा गंभीर आरोप विरोधी पक्षनेते वडेट्टीवार (Vijay Wadettiwar) यांनी केला आहे. या घटनेमुळे नागपूरातील वातावरण चांगलंच तापल्याचं पाहायला मिळत आहे.

विजय वडेट्टीवार
Nagpur News: नागपूरमध्ये स्फोटकं बनवणाऱ्या कंपनीत मोठा स्फोट, ६ कामगारांचा मृत्यू

मृतकाच्या कुटुंबीयांना किमान ४५ लाख रुपयांची मदत मिळावी. जर जर कंपनी मालक २५ लाख रुपये देत असेल तर राज्य सरकारने मदतीची रक्कम वाढवून २० लाख रुपये करावी, अशी मागणी माजी गृहमंत्री अनिल देशमुख आणि विरोधी पक्ष नेते विजय वडेट्टीवार (Nagpur Blast News) यांनी केली आहे. सगळे वर्कर्स ऑन स्किल होते. त्यांना कुठल्याही प्रकारचं प्रशिक्षण दिले जात नव्हतं, अशा पद्धतीचा प्रश्न या माध्यमातून समोर आल्याचं पाहायला मिळत आहे.

नागपुरातील चामुंडा एक्सप्लोसिव्ह ब्लास्ट प्रकरणी हिंगणा पोलिसांनी आता कंपनीचे मालक शिव शंकर खेमका यांना ताब्यात घेतलं (Nagpur News) आहे. संचालक आणि व्यवस्थापकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. मनुष्यवध, मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती मिळतेय.

विजय वडेट्टीवार
Nagpur Hit And Run Case: नागपूर हिट अॅण्ड रन प्रकरणात मोठा ट्विस्ट; अटक केलेल्या सातव्या आरोपीसोबत सूनेचे २५० व्हॉट्सअॅप कॉल आणि चॅट

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com