Nagpur News: नागपूरमध्ये स्फोटकं बनवणाऱ्या कंपनीत मोठा स्फोट, ६ कामगारांचा मृत्यू
Big Explosion In Nagpur CompanySaam Tv

Nagpur News: नागपूरमध्ये स्फोटकं बनवणाऱ्या कंपनीत मोठा स्फोट, ६ कामगारांचा मृत्यू

Big Explosion In Nagpur Company: नागपूरच्या धामणा येथील 'चामुंडी एक्सप्लोजीव' कंपनीत हा स्फोट झाल्याची माहिती समोर आली आहे. स्थानिक गावकऱ्यांनी जखमींना तात्काळ रुग्णालयात दाखल केले.
Published on

पराग ढोबळे, नागपूर

नागपूरमध्ये स्फोटकं बनवणाऱ्या कंपनीमध्ये मोठा स्फोट झाल्याची बातमी समोर आली आहे. नागपूरच्या धामणा येथील 'चामुंडी एक्सप्लोजीव' कंपनीत हा स्फोट झाला आहे. नागपूर-अमरावती महामार्गावर ही कंपनी आहे. कंपनीमध्ये काम सुरू असताना अचानक स्फोट झाला. कंपनीतील काही कामगार जेवणाच्या सुट्टीसाठी गेले होते तर काही जण काम करत होते. या स्फोटामध्ये ६ कामगारांचा मृत्यू झाला. तर ३ जण जखमी झाले. जखमी कामगारांना नजीकच्या रुग्णालयामध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

धामणा येथील 'चामुंडी एक्सप्लोजीव' कंपनीमध्ये दुपारच्या सुमारास अचानक स्फोट झाला. दुपारी १ वाजताच्या सुमारास ही घटना घडली. या कंपनीमध्ये फटाक्यांची वात बनवली जात होती. स्फोटामध्ये कंपनीमध्ये काम करणाऱ्या ६ जणांचा मृत्यू झाला. तर या स्फोटामध्ये ३ जण जखमी झाले आहेत. स्फोटाची माहिती मिळताच गावकऱ्यांनी घटनास्थळी धाव घेत जखमींना तात्काळ रुग्णालयामध्ये नेले. जखमींवर सध्या नागपूर सेनगुप्ता हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. जखमींची प्रकृती गंभीर आहे. स्फोटातील जखमी आणि मृत कामगार हे शेजारच्या धामणा गावातील आहेत.

Nagpur News: नागपूरमध्ये स्फोटकं बनवणाऱ्या कंपनीत मोठा स्फोट, ६ कामगारांचा मृत्यू
Manoj jarange Patil: खासदार बजरंग सोनवणे पुन्हा मनोज जरांगेंच्या भेटीला, २ तास चर्चा; सर्व खासदारांसोबत राज्यपालांची भेट घेणार

या घटनेची माहिती मिळताच नागपूर पोलिस आयुक्त रवींद्रकुमार सिंघल आणि माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी घटनास्थळी धाव घेत पाहणी केली. हा स्फोट इतका भीषण होता की स्फोटामध्ये कंपनीमधील अनेक कामगार जखमी झाले. जखमींमधील अनेकांची प्रकृती खूपच गंभीर होती. त्यांनी घटनास्थळावरच जीव सोडला.

तर इतर ३ जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले असून उपचार सुरू आहे. या स्फोटामध्ये कंपनीचे मोठे नुकसान झाले असून कंपनीचे छत कोसळले आहे. हा स्फोट नेमका कसा झाला यामागचे कारण समजू शकले नाही. नागपूर पोलिसांकडून याचा तपास सुरू आहे. 1986 ला ही कंपनी स्थापन झाली होती त्यानंतर पहिल्यांदाच झालेल्या स्फोटामध्ये कामगारांचा मृत्यू झाला आहे.

Nagpur News: नागपूरमध्ये स्फोटकं बनवणाऱ्या कंपनीत मोठा स्फोट, ६ कामगारांचा मृत्यू
Jalgaon Bribe Case : जप्त वाहन सोडविण्यासाठी मागितली लाच; १० हजार स्वीकारताना पोलीस उपनिरीक्षक ताब्यात

नागपूर पोलिस आयुक्तांनी सांगितले की, या संपूर्ण घटनेची चौकशी केली जाईल. यात काय चुका झाल्या आहेत ते सुद्धा तपासले जाईल. या कंपनीमध्ये फटाक्यांची वात तयार केली जात होती. कंपनीमध्ये काही माल स्टॉक करून ठेवला होता त्यामध्ये स्फोट झाला असल्याचा अंदाज आहे. तर, नागपूरचे नवनिर्वाचित खासदार श्यामकुमार बर्वे यांनी सांगितले की, 'मृतकांच्या कुटुंबियांना मदत मिळावी. यासाठी जिल्हाधिकारी यांना भेटून माहिती घेऊ. या भागात मोठ्या प्रमाणात स्फोटक पदार्थ तयार करणाऱ्या कंपन्या आहत. याठिकाणी रुग्णवाहिका किंवा सुरक्षेच्या अनुषंगाने सोयी सुविधा नव्हत्या. या घटनेची चौकशी झाली पाहिजे. यासाठी संसदेच्या अधिवेशनात हा विषय मांडणार आहे.'

Nagpur News: नागपूरमध्ये स्फोटकं बनवणाऱ्या कंपनीत मोठा स्फोट, ६ कामगारांचा मृत्यू
Pune Porsche Car Accident: पोर्शे अपघातात मोठा ट्विस्ट; आरोपीला वाचविण्यासाठी मृतकांच्या ब्लड रिपोर्टमध्ये फेरफार सुरू, माजी गृहमंत्र्यांचा सरकारवर गंभीर आरोप

या स्फोटानंतर प्रत्यक्षदर्शी दीपक वासेकर यांनी सांगितले की, 'स्फोट झाला तेव्हा मदतीसाठी कोणीच आले नव्हते. आगीत जखमी झालेली लोकं मदतीसाठी याचना करत होते. पण हा स्फोट झाल्यानंतर एक ते दीड तास जखमींना कोणतीही मदत मिळून शकली नाहीत. त्यामुळे घटनेतील मृतांचा आकडा वाढला.' या घटनेनंतर घटनास्थळावर कंपनीमध्ये काम करणाऱ्या कामगारांच्या नातेवाईकांनी गर्दी करत मदतीची मागणी केली.

Nagpur News: नागपूरमध्ये स्फोटकं बनवणाऱ्या कंपनीत मोठा स्फोट, ६ कामगारांचा मृत्यू
Pune Accident News: पुण्यातील मार्केट यार्ड भागात भीषण अपघात; भरधाव डंपरची दुचाकीला धडक, महिला जागीच ठार

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News Saam TV
saamtv.esakal.com