अक्षय बडवे, साम टीव्ही पुणे
पोर्शे कार अपघातामध्ये आता माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी एक खळबळजनक दावा केला आहे. पुणे हिट ॲन्ड रन प्रकरणामध्ये राजकीय दबावाखाली आरोपीचे रक्ताचे नमुने बदलून आरोपी दारू न पिल्याचा अहवाल तयार करण्याचे प्रयत्न झाले, हे उघड झालं आहे. पण आता माजी गृहमंत्री म्हणुन माझी माहिती अशी आहे की, मृतकांच्या व्हिसेरा रिपोर्टमध्ये अल्कोहोल पॉझिटीव्ह यावा, याकरिता पूर्णपणे तयारी झाली आहे.
जेणेकरुन या प्रकरणामध्ये मृत झालेले मोटरसायकलवरील तरुणतरुणी हे दारूच्या नशेत होते. त्यांच्यामुळेच हा अपघात झाला, असं न्यायालयात सिद्ध करता येईल. जेणेकरून विशाल अग्रवालचा मुलगा लवकर सुटेल, अशा पध्दतीने प्रयत्न सध्या सरु असल्याचा गंभीर आरोप अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांनी केला आहे.
माध्यमांशी बोलताना अनिल देशमुख म्हणाले की, पुण्यात हिट अँड रनची केस झाली. यात तरुण आणि तरुणीचा मृत्यू झाला. या घटनेत अल्पवयीन आरोपी दारू पिलेला नव्हता, यात बदल करण्यात आला. मृतकांचा व्हिसेरा पॉझिटिव्ह करण्याचा (Pune Porsche Car Accident) प्रयत्न केला जात आहे. यात सॅम्पलमध्ये अल्कोहोल टाकले तर तो व्हिसेरा पॉझिटव्ह करण्याचा प्रयत्न झाला आहे, असा दावा माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी केला.
विशाल अग्रवालच्या मुलाला वाचवण्यासाठी राज्य सरकारचा हा दुसरा प्रयत्न करत (Porsche Car Accident) आहे. ही बाब अतिशय गंभीर आणि धोकादायक असल्याचं अनिल देशमुख म्हटले आहेत. यात मृतक आरोपी होतील, आरोपी सुटून अशी भीती अनिल देशमुख यांनी व्यक्त केली आहे. रक्ताचे नमुने बदलण्यासाठी कोट्यवधी रुपयांचा व्यवहार झाला होता, अशी माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली होती. विशाल अगरवाल आणि डॉ. तावरे यांच्यात डील झाली (Pune News) होती. डील झाल्यावरच रक्ताचे नमुने बदलण्याचा प्लॅन आखला गेला होता, अशी माहिती समोर येत आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.