voting date saam tv
महाराष्ट्र

Co-operative Societies Elections : राज्यातील सहकारी संस्थांच्या निवडणुका पुढे ढकलल्या; सहकार विभागाचा निर्णय, कारणही सांगितलं

Atul Save : सहकार मंत्री अतुल सावे यांनी याबाबतचा निर्णय जाहीर केला आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Mumbai News : राज्यातील सहकारी संस्थांच्या निवडणुका पुढे ढकलण्याचा निर्णय सहकार विभागाने घेतला आहे. राज्यात ३० जूननंतर होणाऱ्या सहकारी संस्थांच्या निवडणुका आता ३० सप्टेंबरनंतर होणार आहेत. सहकार मंत्री अतुल सावे यांनी याबाबतचा निर्णय जाहीर केला आहे.

राज्यातील सहकारी संस्थांच्या पंचवार्षिक निवडणुकीचा कार्यक्रम राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरणाकडून जाहिर करण्यात आलेला आहे. राज्यात मान्सूनची सुरूवात होत असून ३० जून नंतर मोठ्या प्रमाणात पावसाची सुरूवात होते.

त्यामुळे, ज्या सहकारी संस्थांचा निवडणूक कार्यक्रम जाहिर झालेला आहे, अशा संस्थांचे निवडणूक कामकाज पुर्णपणे पावसाळ्यात होणार आहे. त्यामुळे, निवडणूक प्रक्रियेमध्ये बाधा निर्माण होऊ शकतो. तसेच या सहकारी संस्थांमधील सभासद शेतकरी खरीप हंगामामध्ये शेतीच्या कामामध्ये व्यस्त असल्याने, ते मतदानापासून वंचित राहू शकतात. (Latest Marathi News)

राज्यात ३० जून नंतर पर्जन्यमानाचे स्वरूप जास्त असल्याने, उद्भवणारी नैसर्गिक आपत्ती, पावसामुळे जनजीवन व वाहतूक व्यवस्था विस्कळीत होण्याची शक्यता, तसेच, सदर परिस्थिती पूर्वपदावर येण्यास लागणारा कालावधी विचारात घेता, जास्तीत जास्त मतदारांना निवडणूकीमध्ये सहभाग नोंदवता यावा यासाठी निवडणूक पुढे ढकलण्याच निर्णय घेण्यात आला आहे. (Maharashtra Political News)

राज्यात ८२,६३१ सहकारी संस्था निवडणुकीस पात्र आहेत. राज्यातील ४८,६६७ संस्थांच्या अंतिम मतदार याद्या प्रसिद्ध झाल्या आहेत. राज्यातील ४२,१५७ संस्थांच्या निवडणुका पूर्ण झाल्या असून ६,५१० संस्थांच्या निवडणूक प्रक्रिया सुरु आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: रत्नागिरी - आंबा घाटात दरड कोसळली

Jyoti Chandekar: 'तू फसवलंस आजी...'; पूर्णा आजीला निरोप देताना 'ठरलं तर मग' परिवाराचे अश्रू अनावर

GK: स्मशानभूमीतून घरी परतल्यानंतर आपण आंघोळ का करतो?

Parali News : पुराच्या पाण्यात कार गेली वाहून; तिघांना वाचविण्यात यश, एकाचा शोध सुरू

Mumbai School Bus : माणुसकी! मुंबईला पावसाचा तडाखा, स्कूल बस अडकली पाण्यात, धो धो पावसात पोलिसांनी मुलांना वाचवले

SCROLL FOR NEXT