Aditi Tatkare Saam tv
महाराष्ट्र

Ladki Bahin Yojana: लाडकी बहीण योजनेबाबत मोठी अपडेट! निकषांच्या बदलांबाबत आदिती तटकरे नेमकं काय म्हणाल्या?

Mukhyamantri Majhi Ladki Bahin Yojana Update: नव्या मंत्रिमंडळात या योजनेसंदर्भातील निकषात काही बदल करण्यात आले. मात्र, याच निकषांबाबत महिला आणि बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी मोठी माहिती दिली आहे.

Bhagyashree Kamble

राज्यात मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना सुपरहिट ठरली. लाडकी बहीण योजनेचा लाभ राज्यातील बहुतांश महिलांनी घेतला. ही योजना सुरू झाल्यापासून राज्याच्या तिजोरीवर भार पडत असल्याचं बोललं जात आहे. महायुतीचं सरकार आलं, सरकार स्थापन झाल्यानंतर नव्या मंत्रिमंडळात या योजनेसंदर्भातील निकषात काही बदल करण्यात आले. मात्र, याच निकषांबाबत महिला आणि बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी मोठी माहिती दिली आहे.

निकषात बदल केले की नाही?

मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेतील निकषात काही बदल केल्यानंतर अपात्र महिलांनी योजनेतून नाव कमी करण्यासाठी स्वत:हून पुढाकार घेतला होता. लाखो लाडक्या बहि‍णींनी अर्ज मागे घेण्याबाबत सरकारकडे प्रस्ताव पाठवला. तसेच सरकारनेही अर्ज मागे घेतले आहेत. तर, काही लाडक्या बहि‍णी निकष मागे घेण्याच्या मार्गावर आहेत.

मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या निकषात बदल करण्याबाबत माहिती राज्यात पसरल्यानंतर विरोधकांनी सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधला. आरोप करत मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना लवकरच बंद होणार असल्याचा दावा त्यांनी केला.

अशातच निकषात काही बदल केले आहेत की नाही. यावर महिला आणि बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या निकषात आम्ही कोणतेही बदल केलेले नाही, असं तटकरे यांनी स्पष्ट केलंय.

'मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या कोणत्याही निकषात बदल करण्यात आलेला नाही. त्यामुळे ज्या लाडक्या बहि‍णी निकषात बसत नाही, फक्त अशाच लाडक्या बहि‍णी या योजनेपासून वंचित राहणार आहेत. लाडकी बहीण योजना यशस्वी झाल्यानंतर, काही माध्यमांनी अपप्रचार केला. पात्र महिलांचे देखील लाडकी बहीण योजनेतून नाव वगळण्यात येत आहे. मात्र, गरजू आणि ज्या पात्र आहेत, त्यांना या योजनेच्या लाभापासून महायुतीचं सरकार कधीही वंचित ठेवणार नाही', असा दावा आदिती तटकरे यांनी केला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Dussehra 2025: दसऱ्याला आवर्जून करा ही ३ कामे, पैशांची तंगी होईल कायमची दूर

Scheduled Caste : अनुसूचित जातीचे उपवर्गीकरण केलं नाही, तर...; फडणवीस सरकारला कुणी दिला मोठा इशारा?

Vastu Tips: आंघोळ न करता जेवण बनवणं अशुभ असतं?

Maharashtra Live News Update: भाईंदर पश्चिमेकडील जुगार अड्ड्यावर पोलिसांचा छापा; १८ जुगारी अटकेत

Pranjal Khewalkar: खराडी ड्रग्स पार्टी प्रकरणाला नवे वळण, फॉरेन्सिक रिपोर्टमध्ये नेमकं काय?

SCROLL FOR NEXT