Mukhyamantri Ladki Bahin Yojana Saam tv
महाराष्ट्र

ऑक्टोबर - नोव्हेंबरचा हप्ता एकत्र मिळणार? लाडकी बहीण योजनेबाबत मोठी अपडेट समोर

Mukhyamantri Ladki Bahin Yojana: ऑक्टोबर महिन्याचा हप्ता अद्याप लाभार्थी महिलांच्या बँक खात्यात जमा झालेला नाही. ऑक्टोबर आणि नोव्हेंबर दोन्ही महिन्यांचा हप्ता एकत्र जमा होणार का? असा प्रश्न विचारला जात आहे.

Bhagyashree Kamble

राज्यात सुपरहिट ठरलेली मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा लाभ अनेक बहिणींना मिळतो. या योजनेतून १५०० रूपये हप्ता लाभार्थी महिलांच्या बँक खात्यात जमा होतात. मात्र, ऑक्टोबर महिना गेला, नोव्हेंबर महिन्याची सुरुवात झाली, अद्याप लाडकींच्या बँक खात्यात पैसे जमा झाले नाही. लाडक्या बहिणी ऑक्टोबर महिन्याच्या हप्त्याच्या प्रतिक्षेत आहेत. ऑक्टोबर आणि नोव्हेंबर दोन्ही महिन्यांचा हप्ता एकत्र लाडकींच्या बँक खात्यात जमा होणार का? असा प्रश्न आता लाडक्या बहिणींकडून विचारला जात आहे.

ऑक्टोबर महिन्याचा हप्ता लाडक्या बहिणींच्या बँक खात्यात कधी जमा होणार?

महाराष्ट्र सरकारने गरजू महिलांसाठी सुरू केलेली योजना अल्पावधीतच लोकप्रिय झाली. पात्र महिलांच्या बँक खात्यात दरमहा १५०० रूपये जमा होतात. महायुतीचं सरकार सत्तेत आल्यानंतर या योजनेत काही निकष लादण्यात आले. ज्या महिला या योजनेच्या निकषात बसत नाहीत, त्यांचं नाव या योजनेतून वगळण्यात आलं. सध्या सरकारकडून ई केवायसी अनिवार्य करण्यात आलं आहे. ई - केवायसी बंधनकारक असल्याचं सरकारने म्हटलं आहे.

सध्या लाडक्या बहिणी ऑक्टोबर महिन्याच्या हप्त्याच्या प्रतिक्षेत आहेत. दिवाळी अलटून गेली. भाऊबीज हा सणही गेला. मात्र, अद्याप लाभार्थी महिलांच्या बँक खात्यात पैसे जमा झाले नाहीत. अलिकडेच 'लाडक्या बहिणींना दिवाळीची भाऊबीज सातत्याने मिळत राहिल', असं सांगितलं होतं. मात्र, भाऊबीज बहिणींच्या बँक खात्यात जमा झाला नाही. नोव्हेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात लाभार्थी महिलांच्या खात्यात १५०० रूपये हप्ता वितरत होण्याची शक्यता होती. मात्र, आता ही शक्यता धुसर होत चालली आहे.

दरम्यान, लाभार्थी महिलांच्या बँक खात्यात ऑक्टोबर आणि नोव्हेंबर असे दोन्ही महिन्यांचा हप्ता जमा होणार का? असा प्रश्न लाडक्या बहिणींकडून सरकारला विचारला जात आहे. सध्या राज्यात आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय वारे वेगाने वाहू लागले आहेत. येत्या काही दिवसांत निवडणुका जाहीर होण्याची शक्यता आहे. त्यानंतर आचारसंहिता लागू होईल. यादरम्यान, कोणत्याही शासकीय योजनेअंतर्गत आर्थिक मदत देणं शक्य नसतं. त्यामुळे ऑक्टोबर महिन्याचा हप्ता लाभार्थी महिलांच्या बँक खात्यात पुढील आठवड्यात जमा होण्याची शक्यता आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: आगामी निवडणुकीत जनता आमच्या बाजूने कौल देईल- देवेंद्र फडणवीस

Maharashtra Mahanagarpalika Elections : कार्यकर्त्यांनो लागा कामाला! २९ महापालिकांचा निवडणूक निकाल १६ जानेवारीला, वाचा संपूर्ण वेळापत्रक

What Is Model Code Of Conduct: निवडणूक आचार संहिता लागल्यानंतर काय करावे आणि काय करू नये?

Mahavikas Aghadi News : निवडणूक जाहीर होताच महाविकास आघाडीचा मोठा निर्णय, सत्ताधाऱ्यांना धक्का बसणार?

महापालिका निवडणुकांचा बार उडाला! ‘या’ तारखेला मतदान, काही तासांत निकाल; उमेदवारी अर्ज कधीपर्यंत भरता येणार? VIDEO बघा

SCROLL FOR NEXT