CM Eknath Shinde News Saam Digital
महाराष्ट्र

CM Eknath Shinde News: मराठा समाजाने अनेक नेत्यांना मोठं केल, पण..., आरक्षणाच्या मुद्द्यावरून CM एकनाथ शिंदेचं टीकास्त्र

CM Eknath Shinde News: मराठा समाजाला आरक्षण देण्यावरून विरोधात वक्तव्य करणाऱ्यांचा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी चांगलाच समाचार घेतला आहे. मराठा समाजाने अनेक नेत्यांना मोठं केलं, पण मराठा समाजाला वंचित ठेवले.

Sandeep Gawade

CM Eknath Shinde News

मराठा समाजाला आरक्षण देण्यावरून विरोधात वक्तव्य करणाऱ्यांचा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी चांगलाच समाचार घेतला आहे. मराठा समाजाने अनेक नेत्यांना मोठं केलं, पण मराठा समाजाला वंचित ठेवले. आज मराठा समाजाला देण्याची वेळ आली. तेव्हा अशा प्रकारची तेढ निर्माण करणारी वक्तव्ये केली जात आहेत, अशी वक्तव्य थांबवावीत अशी प्रतिक्रिया प्रसार माध्यमांशी बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली.

मराठा समाजाला गेले अनेक वर्षे वंचित राहावं लागलं. आमच्या सरकारने आरक्षण देण्याची भूमिका घेतली. आमच्या भूमिकेमुळे कोणत्याही समाजावर अन्याय झाला नाही, सर्व समाज आमचेच आहेत. त्यामुळे एकाच काढून दुसऱ्याला देण्याचं काम आमचं सरकार करणार नाही. मराठा समाजाला आरक्षण मिळावं अशी भूमिका असताना अडथळे आणणे, तोंडाला पाने पुसली म्हणणे. सर्वेक्षणावर प्रश्नचिन्ह निर्माण करणं, हे टाळलं पाहिजे.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

प्रतापगडाच्या संवर्धनासाठी १०० कोटी

छत्रपती शिवाजी महाराजांची प्रेरणा आणि उर्जा घेऊन महाराष्ट्र शासन कार्य करत आहे. प्रतापगड हा महाराजांच्या शौर्याचे प्रतिक आहे. किल्ले प्रतापगडाच्या संवर्धनासाठी १०० कोटी रुपयांचा आराखडा तयार करण्यात आला असून त्यापैकी १३ कोटी रुपये उपलब्ध करून देण्यात आले आहेत. प्रतापगडाच्या संवर्धनासाठी शासन कमी पडणार नाही, असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Bhandara News : धरणाच्या प्रवाहात मासेमारी करताना बुडून मृत्यू; मृतदेह वीज निर्मिती कार्यालयात नेट नातेवाईकांचा गोंधळ

Chanakya Niti: आजपासून स्वत:ला लावा या सवयी, पैशाची चणचण कायमची सुटेल

Maharashtra Exit Poll : कराड उत्तर विधानसभा मतदारसंघाचे संभाव्य आमदार कोण? पाहा Exit Poll

Kalwan Exit Poll: कळवण मतदारसंघातून जे. पी. गावित होणार आमदार? काय सांगतो Exit Poll

Maharashtra Exit Poll: मेहकरमध्ये शिंदे गटाचे संजय रायमुलकर होणार आमदार? पाहा Exit Poll

SCROLL FOR NEXT