Eknath Shinde, Ajit Pawar Saam Tv
महाराष्ट्र

Chhatrapati Sambhaji Maharaj : राष्ट्रवादीच्या बालेकिल्ल्यातून बाहेर पडताना मुख्यमंत्र्यांकडून थेट इशाराच

क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या जन्मगावी नायगाव (जि.सातारा) येथे आज राज्यातील प्रमुख नेत्यांनी भेट दिली.

ओंकार कदम

Eknath Shinde : महापुरुषांचा, संतांचा अपमान करण्याचा अधिकार काेणालाही नाही. विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्याकडून धर्मवीर संभाजी महाराज (chhatrapati sambhaji maharaj) यांच्याबाबतचे वक्तव्य अपेक्षीत नव्हते. महापुरुषांचा अपमान सरकार खपवून घेणार नाही असा इशारा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज सातारा जिल्ह्यात दिला. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे विराेधी पक्ष नेते अजित पवार यांच्या विधानाबाबत माध्यम प्रतिनिधींनी विचारलेल्या प्रश्नावर मुख्यमंत्री शिंदे (eknath shinde) बाेलत हाेते.

क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या जन्मगावी नायगाव (जि.सातारा) येथील स्मारकास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पुष्पहार अर्पण करून सावित्रीबाई फुले यांना अभिवादन केले. यावेळी राज्य उत्पादन शुल्क मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई, सहकार व इतर मागास बहुजन कल्याण मंत्री अतुल सावे, खासदार श्रीनिवास पाटील, आमदार सर्वश्री छगन भुजबळ, मकरंद पाटील, महादेव जानकर, सरपंच साधना नेवसे, जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी, मुख्यकार्यकारी अधिकारी ज्ञानेश्वर खिलारी, पोलिस अधीक्षक समीर शेख आदी उपस्थित होते.

विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी छत्रपती संभाजी महाराज हे धर्मवीर नव्हते असे वक्तव्य विधानसभेत केले. त्यावरून पवार यांच्यावर राज्यभरातून टीकेची झाेड उठली आहे. तुम्ही याकडं कसं पाहता असा प्रश्न माध्यम प्रतिनिधींनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना केला. त्यावर शिंदे म्हणाले अजित पवार यांनी धर्मवीर छत्रपती संभाजीराजे यांच्याबद्दल जे वक्तव्य केले, ते त्यांच्याकडून अपेक्षित नव्हते. अजित पवार यांच्याकडून छत्रपती संभाजी महाराज यांच्या बलिदानाचा अपमान झाला आहे.

दरम्यान मुख्यमंत्री शिंदे यांनी साेमवारी अजित पवारांनी माफी मागायला हवी. सर्वाना समान न्याय हवा असे म्हणत अजित पवारांवर टीका केली. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून इतिहास बदलण्याचा आणि पुसण्याचा प्रयत्न होत आहे, असा आरोप देखील त्यांनी केला.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Vastu Tips For Luck: चांगले दिवस येण्यापूर्वीच दिसतात 'हे' शुभ संकेत

Garlic Benefits : लसूण खाण्याची योग्य पद्धत आणि जबरदस्त फायदे

Anna Hazare:'अण्णा आता तरी उठा'! ... मग तुम्ही झोपून राहणार का? बॅनरबाजीवर अण्णा हजारे भडकले

Vice president Election : उपराष्ट्रपतीपदासाठी एनडीएचा उमेदवार ठरला; भाजप अध्यक्षांकडून नाव जाहीर

Accident : भीषण अपघात! कार-एसयूव्हीच्या धडकेत लागलेल्या आगीत ७ जण जिवंत जळाले

SCROLL FOR NEXT