CM Eknath Shinde Saam TV
महाराष्ट्र

Eknath Shinde : पालघरमध्ये १२ लाख रोजगार, कोस्टल रोडचा विरार- पालघरपर्यंत विस्तार, मुख्यमंत्र्यांनी कोणकोणत्या घोषणा केल्या?

Gangappa Pujari

गणेश कवाडे, पालघर|ता. ३० ऑगस्ट २०२४

देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आज महाराष्ट्र दौऱ्यावर आहेत. पालघरमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते वाढवण बंदराचा पायाभरणीचा शुभारंभ केला जात आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार आदी नेते यावेळी उपस्थित होते. कार्यक्रमामध्ये बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी हा प्रकल्प गेमचेंजर ठरेल, असा विश्वास व्यक्त केला.

काय म्हणाले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे?

"आजचा दिवस पालघरच्या इतिहासात व महाराष्ट्राच्या व देशाच्या इतिहासातील सोनेरी दिवस आहे. हा प्रकल्प गेम चेंजर प्रकल्प आहे. महाराष्ट्राला तर याचा फायदा होईलच, पण आपल्या देशाला व पालघरच्या जनतेला सर्वाधिक होईल.आज मोदींच्या हस्ते हे भूमिपूजन होत आहे, मोदींच्या हातात सफलतेचा पारस आहे. जसे भूमिपूजन झाले, तसेच बंदराचे उद्घाटन मोदींच्या हस्ते होईल, असा विश्वास व्यक्त करतो," असे मुख्यंत्री एकनाथ शिंदे म्हणाले.

आयात निर्यातीस चालना मिळेल!

तसेच "पंतप्रधान मोदींच्याच हस्ते भूमिपूजन व्हावा असा योग असणार, त्यामुळे इतक्या वर्षांनंतर हे बंदर मार्गी लागत आहे. डहाणू पालघर हे जगाच्या नकाशावर मोलाचे स्थान मिळवणार आहे. हे महाराष्ट्रासाठी महत्त्वाचे आहे, या बंदरामुळे आयात व निर्यातीस चालना मिळेल. भारत जागतिक व्यापारात अजून समर्थ पणे उतरू शकेल," असा विश्वासही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला.

स्थानिकांना रोजगार मिळेल!

"स्थानिकांना रोजगार, नोकरी मिळेल, वाढवण बंदर विकासात मच्छीमार बंदर व स्थानिकांना न्याय दिला जाईल. कुणालाही वाऱ्यावर सोडले जाणार नाही, पर्यावरणाची आपण काळजी घेत आहोत. छत्रपती शिवाजी महाराजांचा वारसा आपण चालवत आहोत. आता नरीमन पॉईंट पासून कोस्टल रोड विरार, ते पालघर पर्यंत आणण्याचा सरकारचा विचार आहे. सिंगापूर, कोलंबो या बंदरांवर आता भारताला अवलंबून राहावे लागणार नाही," असेही ते म्हणाले.

२०४७ पर्यंत भारत महासत्ता!

"दिघी पोर्टच्या विकासाला केंद्र सरकारने आता हिरवा झेंडा दाखवला आहे. म्हणून दिघी पोर्ट शेजारी हे दुसरे औद्योगिक मोठे बंदर असेल. पंतप्रधानांचे मी आभार मानतो. मुंबईला वैष्विक फिनटेक शहरात बदलण्याची घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केली आहे. मुंबई महानगरासह पालघर, रायगड विकासावर आता लक्ष केंद्रित केले जाते आहे. २०३० पर्यंत २६ लाख कोटींपर्यंत एमएमआर विभागाची उलाढाल नेण्याचा विचार आहे. मोदींच्या नेतृत्वात आता देश आर्थिक महासत्ता होण्याच्या दिशेने वाटचाल करत आहे. २०४७ पर्यंत विकसित भारत जगाची महासत्ता म्हणून उदयास येईल," असे प्रतिपादन एकनाथ शिंदे यांनी यावेळी केले.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mumbai Pune Expressway : मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर भीषण अपघात; तीन वाहने एकमेकांना धडकली, पाहा VIDEO

Sukanya Samruddhi Yojana: १० हजार १५ वर्षे भरा, २१ व्या वर्षी मुलीच्या खात्यात तब्बल ३८ लाख; जाणून घ्या सरकारची भन्नाट योजना

Maharashtra Politics : महायुतीच्या जागावाटपाचं घोडं कुठं अडलं? कोणत्या पक्षाला काय हवं?

Mumbai Metro News: मुंबईकरांसाठी गुड न्यूज! 'मेट्रो ३' आरे ते बीकेसी टप्पा लवकरच सुरु होणार; ऑक्टोंबरमध्ये PM मोदी करणार लोकार्पण

Maharashtra Politics : अमित शहा पुन्हा महाराष्ट्र दौऱ्यावर येणार; महायुतीत काहीतरी मोठं घडणार, नेमकं काय?

SCROLL FOR NEXT