CM Eknath Shinde Saam Digital
महाराष्ट्र

Maharashtra Politics: विधानसभेआधी 'मराठी'ला अभिजात भाषेचा दर्जा मिळणार? CM एकनाथ शिंदेंचे प्रयत्न; कागदपत्रांची पूर्तता झाल्याची माहिती

Marathi Language Status Of Classical Language: मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा यासाठी गेल्या अनेक वर्षांपासून राज्य सरकार प्रयत्न करत आहेत. अशातच विधानसभेच्या आधी मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळण्याबाबतचा मोठा निर्णय होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

Gangappa Pujari

वैदेही कानेकर| मुंबई, ता. १८ जुलै २०२४

विधानसभा निवडणुकीच्या आधी मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळण्याबाबत मोठा निर्णय होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे प्रयत्न करणार असून यासाठीच्या कागदपत्रांची पुर्तता करण्यात आल्याचेही समोर आले आहे.

मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा यासाठी गेल्या अनेक वर्षांपासून राज्य सरकार प्रयत्न करत आहेत. काल राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्वेसर्वा ज्येष्ठ नेते शरद पवार यांनीही मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळण्याबाबत राज्य सरकारला चिमटा काढला होता. याबाबत आता महत्वाची अपडेट समोर आली असून विधानसभेच्या आधी मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळण्याबाबतचा मोठा निर्णय होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

स्वत: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळण्यासाठी प्रयत्न करणार आहेत. यासंदर्भात लागणाऱ्या कागदपत्रांची पूर्तता झाली असल्याची माहितीही समोर आली असून याबाबत मुख्यमंत्री विभागाकडून संबधिक विभागाला पत्र लिहून आढावा घेतला जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

दरम्यान, गेल्या अनेक वर्षांपासून मराठी भाषेला अभिजात दर्जा देण्याचा विषय प्रलंबित आहे. मराठी भाषेला अभिजात दर्जा देण्यावरून अनेक निवडणुका लढल्या गेल्या, मात्र प्रत्यक्षात निर्णय प्रलंबित आहे. याआधी उद्धव ठाकरे यांनीही पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेत, मराठीला अभिजात दर्जा मिळावा याबाबत मागणी केली होती.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Sneha Wagh: आता मुंबई आपलीशी वाटत नाही...; यूपीतून परत आल्यावर अभिनेत्री स्नेहा वाघ असं का म्हणाली?

High cholesterol symptoms: डोळ्यापासून-पायांपर्यंत...! पाहा शरीरात कोलेस्ट्रॉल वाढल्यावर कोणत्या अवयवांमध्ये दिसतात लक्षणं?

Diwali Lakshmi Pujan: लक्ष्मीपूजनात राशीनुसार करा हे खास उपाय, भरपूर पैसा अन् सुख- समृद्धी मिळेल

Fraud Case : शिंदेसेनेच्या कार्यकर्त्याचा व्यावसायिकाला १३ लाखांचा गंडा, फसवणुकीचा प्रकार उघड, नेमकं काय घडलं ?

Maharashtra Live News Update : नवी मुंबईत भीषण आग, ६ जणांचा मृत्यू

SCROLL FOR NEXT