Eknath Shinde On Rahul Gandhi saam tv
महाराष्ट्र

CM Eknath Shinde : राहुल गांधींनी एकदा तरी त्या सेल्यूलर जेलमध्ये राहून यावं, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची टीका

Eknath Shinde About Rahul Gandhi : माफी मागायला माझं नाव सावरकर नाही, माझं नाव गांधी आहे आणि गांधी माफी मागत नाही, असे वक्तव्य राहुल गांधींनी केले आहे.

Chandrakant Jagtap

Eknath Shinde On Rahul Gandhi : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राहुल गांधींवर हल्लाबोल केला आहे. सावरकर हे केवळ महाराष्ट्राचं नाही तर संपूर्ण देशाचं दैवत आहे. त्यांचा अपमाण राहुल गांधी यांनी केला आहे. असे म्हणत राहुल गांधींनी एकदा तरी सेल्यूलर जेलमध्ये राहून यावं अशी टीका मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली आहे. विधासभा अधिवेशनादरम्यान सभागृहात बोलताना त्यांनी ही टीका केली आहे.

मोदी आडनावाबद्दल केलेल्या वक्तव्याप्रकरणी काँग्रेस नेते राहुल गांधी यांना गुजरातमधील कोर्टानं दोषी ठरवत दोन वर्षांची शिक्षा सुनावली. यानंतर राहुल गांधी यांची खासदारकी रद्द करण्यात आली आहे. लोकसभा सचिवालयानं यासंबंधीत नोटिफिकेशन देखील प्रसिद्ध केले आहे.

यावर बोलण्यासाठी राहुल गांधी यांनी आज पत्रकार परिषद घेऊन भाजप आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींवर हल्लाबोल केला. यावेळी एका प्रश्नाला उत्तर देताना त्यांनी माफी मागायला माझं नाव सावरकर नाही, माझं नाव गांधी आहे आणि गांधी माफी मागत नाही असे वक्तव्य केले होते. यावरून एकनाथ शिंदे यांनी त्यांच्यावर टीका केली आहे.

मुख्यमंत्री म्हणाले राहुल गांधी यांनी वारंवार सावरकरांचा अपमान केला आहे. आजही त्यांनी सावरकरांचा पुन्हा अपमाण केला. सावरकर हे केवळ महाराष्ट्राचं नाही तर संपूर्ण देशाचं दैवत आहे. त्यांनी मरण यातना भोगल्या, काळ्या पाण्याची जेल भोगली, त्यांना घाण्यावर जुंपण्यात आलं. देशाच्या स्वातंत्र्यासाठी त्यांनी इतक्या हालअपेष्टा भोगल्या.

राहुल गांधींनी एकदा तरी सेल्यूलर जेलमध्ये राहून यावं, अर्धा तासच त्यांना त्या घाण्याला जुंपलं तर त्यांना कळेल त्यांच्या यातना काय आहेत? त्यामुळे त्यांचा निषेध करावा तेवढा कमी आहे, असे मुख्यमंत्री शिंदे म्हणाले.

'राहुल गांधींनी फक्त पंतप्रधानांचाच अपमान नाही केला, तर....'

पुढे बोलताना मुख्यमंत्री म्हणाले, राहुल गांधींनी मोदी साहेबांविषयी जे वक्तव्य केलं, त्याची शिक्षा त्यांना कोर्टाने दिली आहे. काँग्रेसने केलेल्या कायद्याप्रमाणेच त्यांना दोन वर्षांची शिक्षा दिली आहे. याआधीही अनेकांना या काद्याप्रमाणे शिक्षा झाली आहे. त्यावेळी कोणी निदर्शने केली नाही. त्यांनी केवळ पंतप्रधानांचाच अपमाण नाही केला तर समस्त ओबीसी समजाचा अपमाण केला आहे. त्यामुळे त्यांचा निषेध करावा तेवढा कमी आहे, असेही ते म्हणाले.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Women Qualities: महिलांच्या या सवयीचं पुरूषांकडून होतं कौतुक, जिंकतात हृदय

Parenting Tips: मुलांना शिस्त लावायची आहे? मग पालकांनी ही चूक कधीच करु नका अन्यथा...

Maharashtra Election : मुख्यमंत्र्यांच्या बालेकिल्ल्यात दोन्ही सेनेचे शिवसैनिक आमनेसामने; पुढे नेमकं काय घडलं? वाचा

VIDEO : केलंय काम भारी, लुटली तिजोरी; उद्धव ठाकरेंचा भाजपला टोला

AUS vs PAK: बाबर आझमने टी-२० क्रिकेटमध्ये रचला इतिहास! मोठ्या रेकॉर्डमध्ये विराटला सोडलं मागे

SCROLL FOR NEXT