Shruti Vilas Kadam
सततचा ताण मेंदूवर परिणाम करतो. त्यामुळे वारंवार डोकेदुखी, चक्कर येणे आणि कायम थकवा जाणवण्याची समस्या निर्माण होऊ शकते.
अती ताणामुळे झोप न येणे, वारंवार जाग येणे किंवा अपुरी झोप होणे अशा समस्या उद्भवतात, ज्याचा थेट परिणाम शरीराच्या आरोग्यावर होतो.
ताणामुळे अॅसिडिटी, पोटदुखी, बद्धकोष्ठता किंवा जुलाब यांसारख्या पचनाच्या तक्रारी वाढू शकतात.
दीर्घकाळ ताण घेतल्यास रक्तदाब वाढण्याचा धोका असतो. यामुळे हृदयविकाराचा धोका देखील वाढू शकतो.
रोगप्रतिकारशक्ती कमी होते
सततचा ताण शरीराची इम्युन सिस्टिम कमजोर करतो, त्यामुळे सर्दी, खोकला आणि इतर आजार वारंवार होण्याची शक्यता वाढते.
त्वचा आणि केसांवर दुष्परिणाम होतात
जास्त ताणामुळे केस गळणे, कोंडा, त्वचा कोरडी होणे, मुरुम येणे अशा समस्या उद्भवू शकतात.
मानसिक आरोग्यावर परिणाम होतो
ताणामुळे चिडचिड, नैराश्य, चिंता आणि एकटेपणाची भावना वाढू शकते, ज्याचा दैनंदिन जीवनावर नकारात्मक परिणाम होतो.