Maharashtra Live News Update: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नाटकं करू नये - चव्हाण

Marathi Breaking Live Marathi Headlines Updates: आज रविवार, दिनांक १४ डिसेंबर २०२५, हिवाळी अधिवेशनाचा शेवटचा दिवस, राज्यात थंडीचा कडाका वाढला, जिल्हा परिषद-महापालिका निवडणुका अपडेट्स, आजच्या ताज्या बातम्या, राज्यातील महत्त्वाचे अपडेट्स वाचा एका क्लिकवर...
Maharashtra Live News Update
Maharashtra Live News UpdateSaam tv

ऊसाच्या शेतात चारही पाय तोडलेल्या मादी बिबट्याचा मृतदेह

सातारा तालुक्यातील मत्त्यापूर येथील बरड शिवारात एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला.शेतकरी रविंद्र आबाजी घोरपडे यांच्या ऊसाच्या शेतात चारही पाय तोडलेल्या मादी बिबट्याचा मृतदेह आढळून आल्याने संपूर्ण परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

बुलढाणा जिल्ह्यात लवकरच दाखल होणार 150 ईव्ही एसटी बस

पर्यावरणाला आळा घालण्यासाठी राज्यभरातच ईव्ही एसटी बस दाखल झाल्या आहेत, त्या पार्श्वभूमीवर बुलढाण्यातील सात आगारांसाठी विद्यार्थी आणि राजकीय नेत्यांच्या मागणीनुसार 150 ईव्ही एसटी बसची मागणी करण्यात आली होती.. त्यापैकी पहिल्या टप्प्यात या आठवड्यात 12 बस दाखल होणार आहेत, तर काही दिवसात उर्वरित बस देखील टप्प्याटप्प्याने येणार आहेत..

१६ डिसेंबरला महाविकास आघाडीचा भव्य मोर्चा

पनवेल शहरातील विविध महत्त्वपूर्ण नागरी प्रश्न, महापालिकेची धोरणे आणि नागरिकांवर वाढत असलेला ताण, महानगरपालिकेचा वाढीव मालमत्ता कर, शहरातील रस्ते, पाणीटंचाई, तळोजा एमआयडीसी परिसरातील गंभीर प्रदूषण यांसह अनेक तातडीच्या समस्यांकडे लक्ष वेधले.

या सर्व प्रश्नांवर आवाज उठवण्यासाठी पनवेल महाविकास आघाडीच्या वतीने १६ डिसेंबर रोजी पनवेलमध्ये भव्य मोर्चाचे आयोजन करण्यात येणार असल्याची घोषणा यावेळी करण्यात आली. या मोर्चात महाविकास आघाडीतील राज्यपातळीवरील प्रमुख नेतेही सहभागी होणार आहेत

मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांनी आरोपीचा समर्थन करणाऱ्या लोकांवर कारवाई करावी : धनंजय देशमुख

बीडसह छत्रपती संभाजीनगर मध्ये काल दिवसभर सुनावणी पार पडली पुढच्या तारखेपर्यंत चार्ज फ्रेम होईल अशी अपेक्षा आहे. संभाजीनगर येथे कोर्टाला व्हिडिओ दाखवण्यात आले.. कोर्ट ते पाहू शकलं नाही आम्हाला आश्रु अनावर झाले. आम्ही या दुःखातून बाहेर निघालेले नाहीत. आणि कधी निघू शकणार नाहीत.. एवढ्या निर्गुणपणे ही हत्या करण्यात आली. आणि आरोपीचा समर्थन करणारी टोळी सक्रिय झालीये तिला वारंवार सोशल मीडिया असेल बोलताना आरोपीची आठवण येत आहे.. या लोकांवर कारवाई झाली पाहिजे यासाठी मुख्यमंत्र्यांना आणि गृहमंत्र्यांना कारवाई करावी. अशी मागणी धनंजय देशमुख यांनी केली आहे.

शिक्षण विभागाची मोठी कारवाई, मुंबईतील दोन शाळांची मान्यता रद्द

मोफत शिक्षण कायद्याचं उल्लंघन केल्याप्रकरणी मुंबईतील दोन शाळांची मान्यता रद्द करण्यात आली.

श्रीमती मनरादेवी एज्युकेशन संस्था आझादवाडी, दामू नगर, कांदिवली पूर्व मुंबई, तर हनुमंत विद्यामंदिर शाळा कावरपाडा सातीवली पूर्व केंद्र वालीव तालुका वसई जिल्हा पालघर इंग्रजी माध्यम आणि हिंदी माध्यम या दोन शाळांची मान्यता शिक्षण विभागाने केली रद्द

DHULE धुळ्यात आज तापमानाचा पारा 6°c वर

धुळ्यात गेल्या काही दिवसांपासून तापमानाचा पारा दहा अंशांच्या खाली नोंदविला गेला आहे, धुळ्यात आज तापमानाचा पारा 6°c वर आहे, वाढत्या थंडीमुळे धुळेकर नागरिक चांगलेच गारठले असून, थंडीपासून आपला बचाव करण्यासाठी नागरिक शेकोटीचा आधार घेत गरम व उबदार कपड्यांचा आधार घ्यावा लागत आहे,

हवेमध्ये वाढलेला प्रचंड गारवा यामुळे धुळेकरांना वाढत्या थंडीचा सामना करावा लागत आहे, यापुढे देखील थंडीचा जोर असाच कायम राहण्याचा अंदाज हवामान विभागातर्फे वर्तविण्यात आला आहे, त्यामुळे पुढील काळात देखील अशाच प्रकारे धुळेकरांना थंडीचा सामना करावा लागणार असल्याचा अंदाज आहे.

कोकणात थंडीने जोर धरल्यामुळे आंबा काजू कलमांना जोमदार मोहर

सिंधुदुर्ग जिल्ह्यात थंडीने मागील आठवड्यापासून जोर धरल्याने कोकणातील किनारी भागात आंबा आणि काजू कलमांना मोठ्या प्रमाणात मोहर आल्याचे दिसून येत आहे. देवगड,वेंगुर्ला, म्हापण, खवणे, निवती या पट्ट्यात समुद्राची खारट हवा आणि थंडी यामुळे आंबा बागायतींमध्ये कलमांना जोमदार मोहर आला आहे. पुढील १५ दिवस थंडी कायम राहिल्यास यंदा कोकणात आंबा, काजू, जांभूळ पीक जोरदार येण्याची शक्यता आहे.

पाथरी तालुक्यात अवैध रेती उत्खननाविरोधात महसूल व पोलीस प्रशासनाने संयुक्त कारवाई

पाथरी तालुक्यात अवैध रेती उत्खननावर प्रशासनाची कडक कारवाई करण्यात आली . महसूल व पोलीस प्रशासनाच्या संयुक्त पथकाने गोंडगाव येथे कारवाई करत अवैध रेती उत्खननासाठी वापरण्यात येणारे तराफे जागेवरच नष्ट केले आहेत. नायब तहसीलदार रमेश धोपे यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या कारवाईत पोलीस निरीक्षक , ग्राम महसूल अधिकारी तसेच संबंधित कर्मचारी सहभागी होते. अवैध रेती उत्खननामुळे पर्यावरणाचे होत असलेले नुकसान रोखण्यासाठी आणि कायद्याची अंमलबजावणी करण्यासाठी अशा कारवाया पुढेही सुरू राहणार असल्याचा इशारा प्रशासनाने दिला आहे.

nashik-chandvad-रस्त्याच्या वादातून सख्या भावाने भावाला जाळण्याचा केला प्रयत्न

नाशिकच्या चांदवड तालूक्यातील गंगावे येथे रस्त्याच्या वादातून सख्या भावाने च भावाला जाळण्याचा प्रयत्न शुक्रवारी पहाटेच्या दरम्यान घडला.गंगावे येथील नरोटे वस्तीवर राहणा-या काशिनाथ चिंधा नरोटे व त्यांचा भाऊ दामू चिंधा नरोटे यांच्यात शेत रस्त्याच्या व मागील भांडणाची कुरापत काढून दामू चिंधा नरोटे याने शुक्रवारी पहाटेच्या दरम्यान घरातील लोकांच्या मदतीने घराबाहेर खाटेवर झोपलेल्या भावाच्या अंगावर पेट्रोल टाकून जाळण्याचा प्रयत्न केला त्यात काशिनाथ नरोटे गंभीर जखमी झाले ही घटना लक्षात येताच त्यांना तातडीने प्राथमिक उपचारासाठी चांदवडच्या उपजिल्हा रुग्णालयात दाखल करुन पुढील उपचारासाठी नाशिक येथे पाठवण्यात आले असून चांदवड पोलिस या प्रकरणाचा अधिक तपास करीत आहे.

बदलापुरातल्या घोरपडे चौकात भीषण आग

बदलापूर आतल्या घोरपडे चौकात आज भीषण आग लागली. इथल्या स्पर्श हॉस्पिटलच्या ग्राउंड फ्लोअर वरील अल्फा फार्मसीला या आग लागली. पहाटे 4 च्या सुमारास ही आग लागली. सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झालेली नाही.

गेल्या २४ तासांत थंडीचा पारा पुन्हा अर्धा ते एक अंशाने खाली आला.

पुणे शहरासह जिल्ह्यात गेल्या २४ तासांत थंडीचा पारा पुन्हा अर्धा ते एक अंशाने खाली आला. त्यामुळे थंडीची लाट आणखीन तीव्र झाली आहे

बारामातीसह पाषाण आणि शिवाजीनगर परिसरात कडाक्याच्या थंडी आणि दाट धुके होते.दरम्यान, पुढील दोन दिवस शहरासह जिल्ह्यातील हवामान कोरडे राहील, पहाटे धुक्याचे प्रमाण वाढेल तर किमान तापमानात काही अंशी घट होणार असल्याने थंडीची लाट कायम राहील, असा अंदाज पुणे वेधशाळेने वर्तविला आहे.

आजचे तापमान

पाषाण ८.३

शिवाजीनगर ८.८

कोरेगाव पार्क १३.३

चिंचवड १४.१

वडगावशेरी १५.३

मगरपट्टा १५.६

हवेली ७.१

बारामती ७.७

माळीण ८.५

दौंड ९.३

तळेगाव ९.४

आंबेगाव १०

निमगिरी ११.२

भोर १३.१

मुदखेडमध्ये भीषण आग: दोन दुकाने जळून खाक. लाखो रुपयाची नुकसान 

नांदेडच्या मुदखेड शहराच्या मध्यवस्तीत असलेल्या अनुसया मार्केटमध्ये मध्यरात्री भीषण आग लागली. या आगीत दोन नामांकित दुकाने पूर्णपणे जळून खाक झाली असून व्यापाऱ्यांचे लाखो रुपयांचे झाले आहे.शहरातील अनुसया मार्केटमधील स्वामी समर्थ फूटवेअर आणि कार्तिक ड्रायक्लीनर्स या दोन दुकानाला आग लागली. आगीने रौद्र रूप धारण केले. अग्निशमन दलाच्या जवानांनी आग विझवण्याचा प्रयत्न केला. परंतु या घटनेत दोन्ही दुकानदारांचे लाखो रुपयाचे नुकसान झाले.

अंबड येथील तहसील कार्यालयाच्या प्रवेशद्वारावरच लावले एलईडी स्क्रीन 

जालना जिल्ह्यातल्या अंबड तहसील कार्यालयाच्या प्रवेशद्वारावरच आता राजकीय पक्षाचे नेते,पदाधिकारी, आणि सर्वसामान्य नागरिकांना स्ट्रॉंग रूम मधील सर्व चित्रीकरण 24 तास पाहता येणार आहे. प्रशासनाकडून या ठिकाणी एलईडी स्क्रीन लावण्यात आलं असून येणाऱ्या जाणाऱ्या नागरिकांना सर्व चित्रीकरण पाहता येणार असून त्यांच्या मनातील भीती दूर होऊन पारदर्शकता दिसून येईल अशी प्रतिक्रिया अंबड चे तहसीलदार विजय चव्हाण यांनी दिलीय. अंबडच्या स्ट्रॉंग रूम अवतीभवती त्रिस्तरीय पोलीस बंदोबस्त तैनात असून सीसीटीव्ही कॅमेऱ्याची देखील करडी नजर आहे शिवाय त्यातच आता भर पडून एलईडी स्क्रीन सुद्धा लावण्यात आली आहे.

थंडीत नदीचा अनोख नजरांना,यवतमाळ जिल्ह्यात हुडहुडी कायम

हवामान विभागाने थंडीची लाट येणार असल्याचा अंदाज वरती दिला होता यंदाच्या हंगामातील सर्वाधिक कमी तापमानाची नोंद काल करण्यात आली.दरम्यान उत्तरेकडून येणाऱ्या थंड वाऱ्यामुळे यवतमाळ अनेक जिल्हे गारठले असून थंडीमुळे पहाटे दरम्यान नदीतून वाहणाऱ्या पाण्यातून वाफा निघत असल्याचे चित्र पाहायला मिळतेय

केडीएमसीचा अजब कारभार पुन्हा उघड, झोपडीला २.३३ लाखांचा मालमत्ता कर

कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या कारभारातील गळथान कारभार पुन्हा एकदा समोर आला आहे. काही दिवसांपूर्वी मयत आणि सेवेतून निवृत्त कर्मचाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश निघाल्याचा प्रकार ताजा असतानाच, आता टिटवाळ्यातील कातकरी पाड्यात राहणाऱ्या एका आदिवासी विधवा महिलेला तब्बल २ लाख ३३ हजार रुपयांचा मालमत्ता कर भरण्याची नोटीस पाठविण्यात आली आहे.

बिबट्याने घेतला चार वर्षीय चिमुकल्याचा बळी.. संगमनेर तालुक्यातील घटना

संगमनेर तालुक्यातील जवळे कडलग गावात सायंकाळी साडेसहा वाजेच्या सुमारास बिबट्याने एका चार वर्षीय चिमुकल्याचा बळी घेतल्याची धक्कादायक घटना घडलीय..यामुळे चिमुकल्याचे नातेवाईक आणि ग्रामस्थ संतप्त झाले असून जोपर्यंत नरभक्षक बिबट्याला ठार केले जात नाही तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नसल्याचा पावित्रा घेतल्याने वातावरण तणावपूर्ण बनलय.

Maharashtra Live News Update: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नाटकं करू नये - चव्हाण

माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या हस्ते पिंपरी चिंचवड जन गण मन या पुस्तकाच प्रकाशन करण्यात आल. या कार्यक्रमांत बोलताना पृथ्वीराज चव्हाण यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडकवीस यांच्यावर कडवी टीका केली आहे. विधानसभेतील विरोधी नेते पद देण्यासाठी देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभा अध्यक्ष तसेच सभापती यांच्या मागे लपू नये म्हणत मुख्यमंत्री यांच्यावर निशाणा साधला आहे. महाराष्ट्र सरकारने मुख्यतः देवेंद्र फडणवीस यांनी मोठे पना दाखवत विरोधी पक्षाला स्थान दिले पाहिजे l... विरोधी नेते पदाला एक पद मिळते त्यांना कॅबिनेटच्या दर्जा मिळतो l, त्यांना एक कार्यालय मिळतो, मात्र ते देण्यासाठी त्यांनी विधानसभा अध्यक्ष असेल किंवा सभापती असेल यांच्या मागे त्यांनी लपू नये हा सर्व अधिकार त्यांचा आहे.त्यामुळे त्यांनी बाकी काही नाटक करू नका तुम्हाला जर करायचे असेल तर लगेच करून टाका किंवा नसेल करायचे तर तसे सांगून टाका अशी टीका माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com