Mobile Battery Low: मोबाईलची बॅटरी अचानक कमी होतेय? तर 'या' ४ सेटींग्स आत्ताच बंद करा

Smartphone Tips: मोबाईलची बॅटरी लवकर संपत असेल तर काही अनावश्यक सेटिंग्स कारणीभूत ठरू शकतात. Wi-Fi, Bluetooth, GPS आणि बॅकग्राउंड अ‍ॅप्स बंद केल्यास बॅटरी आयुष्य नक्की वाढेल.
smartphone battery saving tips
mobile battery draining fastgoogle
Published On

स्मार्टफोनमध्ये असंख्य फीचर्स दिलेले असतात, मात्र प्रत्येक फीचर सतत सुरू ठेवणं आवश्यकच असे नाही. अनेकदा फोनची बॅटरी लवकर संपण्यामागे काही अशा सेटिंग्स कारणीभूत ठरतात, ज्या गरज नसतानाही चालू असतात. जर तुमचा मोबाइल दिवसभर बॅटरी टिकवत नसेल, तर या सेटिंग्सकडे लक्ष देणं महत्त्वाचं ठरेल.

Wi-Fi आणि Bluetooth वापरत नसतानाही सुरू ठेवल्याने फोनची बॅटरी वेगाने खर्च होते. कारण कनेक्ट नसतानाही हे दोन्ही फीचर्स बॅकग्राउंडमध्ये सतत नेटवर्क आणि डिव्हाइस शोधत असतात. त्यामुळे थोडीशी सोय जरी मिळत असली, तरी बॅटरी बचतीसाठी गरज नसताना Wi-Fi आणि Bluetooth बंद ठेवणं फायदेशीर ठरतं.

smartphone battery saving tips
Sweet Potato Bhaji: रताळ्याची भाजी बनवण्याची सोपी पद्धत, टिफीनसाठी ठरेल बेस्ट रेसिपी

आजकाल फोटो, व्हिडीओ किंवा मोठ्या फाइल्स शेअर करण्यासाठी Quick Share हे फीचर मोठ्या प्रमाणावर वापरले जाते. मात्र वापर नसताना ते सुरू ठेवले असल्यास बॅटरीवर परिणाम होतो. हे फीचर सतत आजूबाजूच्या डिव्हाइसेस आणि शेअरिंग रिक्वेस्ट शोधत असल्यामुळे Wi-Fi आणि Bluetooth दोन्ही वापरते. त्यामुळे अनेक युजर्सना यामुळे जास्त पावर ड्रेनचा अनुभव येतो. जर Quick Share नियमित वापरात नसेल, तर त्याच्या सेटिंगमध्ये जाऊन शेअरिंगचा पर्याय बंद ठेवणे योग्य ठरतं.

फोन वापरताना टायपिंग किंवा कॉल डायल करताना येणारे वायब्रेशन म्हणजेच हॅप्टिक फीडबॅक देखील बॅटरी खर्च करतो. एक-दोन वेळचा वायब्रेशन फारसा परिणाम करत नाही, पण दिवसभरात शेकडो वेळा होणाऱ्या वायब्रेशनमुळे बॅटरीवर मोठा परिणाम होतो. त्यामुळे वायब्रेशन बंद केल्यास बॅटरीचा वापर कमी करता येतो.

फोनमध्ये इन्स्टॉल केलेले अनेक अ‍ॅप्स बॅकग्राउंडमध्ये सतत काम करत असतात. इंटरनेट वापरणे, डेटा सिंक करणे किंवा कंटेंट रिफ्रेश करणे हे सगळे फोन न वापरतानाही सुरूच असते. यामुळे बॅटरी अनावश्यकरीत्या खर्च होते. जे अ‍ॅप्स अत्यावश्यक नाहीत, त्यांच्यासाठी बॅकग्राउंड अ‍ॅप रिफ्रेश आणि बॅकग्राउंड डेटा वापर बंद केल्यास बॅटरी लाइफ सुधारू शकते.

डिस्प्लेनंतर सर्वाधिक बॅटरी खाणारे फीचर म्हणजे GPS किंवा लोकेशन सर्व्हिस. लोकेशन कायम सुरू असल्यास अनेक अ‍ॅप्स बॅकग्राउंडमध्ये त्याचा वापर करत राहतात आणि बॅटरी झपाट्याने संपते. या काही साध्या सेटिंग्सकडे लक्ष दिल्यास आणि गरज नसताना त्या बंद ठेवल्यास तुमचा स्मार्टफोन दिवसभर सहज चालू राहू शकतो.े

smartphone battery saving tips
Kitchen Hacks: गॅसवर ठेवताच दूध पटकन फाटते? गरम करताना ही गोष्ट लक्षात ठेवाच

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com