devendra fadnavis  Saam tv
महाराष्ट्र

उद्धव ठाकरेंची मध्यरात्री 'वर्षा' निवासस्थानी भेट झाली का? CM फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं

devendra fadnavis latest news : मुख्यमंंत्री देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरेंची मध्यरात्री 'वर्षा' निवासस्थानी भेट झाल्याचा दावा करण्यात येत आहे. या कथित भेटीच्या चर्चांवर आता मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे.

Vishal Gangurde

ठाकरेंना भेटल्याचा कथित दावा मुख्यमंत्र्यांनी फेटाळला

आम्हाला लपून छपून भेटायची गरज नसल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले

खोट्या बातम्या देणाऱ्यांवर कारवाई करणार असल्याचे त्यांनी म्हटलं

राज्यात उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कथित भेटीच्या चर्चेने राजकीय चर्चांना उधाण आलं आहे. दोघांच्या कथित भेटीवर संजय राऊतांनी बोलण्यास नकार दिला. तर भाजप प्रवक्त्यांनाही कथित भेटीचा कल्पना नाही. आता कथित भेटीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची प्रतिक्रिया समोर आली आहे. आम्हाला लपून छपून भेटायची गरज नसल्याचे म्हणत भेटीचे वृत्त फेटाळून लावलं. तर कथित भेटीची बातमी देणाऱ्या वृत्तसंस्थेला नोटीस पाठवणार असल्याचेही स्पष्ट केले.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नाशिकमधील त्रंब्यकेश्वर दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यादरम्यान मुख्यंमंत्र्यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी कथित भेटीच्या चर्चांवर मुख्यमंत्र्‍यांनी भाष्य केलं. 'उद्धव ठाकरेंना मला भेटायचे असेल. किंवा त्यांना माझी भेट घ्यायची असेल तर लपून छपून करण्याची आवश्यकता नाही. ती उघड भेट करता येऊ शकते. कोणतेच विषय आमच्यात नाही, आता लपवण्यासारखा कोणताच विषय राहिला नाही'.

'आमची अशा प्रकारची कुठलीही भेट घडलेली नाही. काही लोक जाणीवपूर्वक चुकीच्या पद्धतीने बातम्या देतात. खोट्या बातम्या देणाऱ्या हँडल आणि पोर्टल्सला नोटीस दिली जाईल, असेही फडणवीसांनी सांगितले.

४ अपत्य जन्माला घालावेत, त्यातील एकाला 'आरएसएस'मध्ये पाठवावे, असं विधान बागेश्वर बाबाने केलं आहे. यावर फडणवीस म्हणाले, 'शेवटी साधूसंत असतात, त्यांची मते मांडत असतात. त्यांचा उद्देश समजून घेतला पाहिजे. त्यांच्या बोलण्याचा उद्देश होता की, संघ ही अशी संघटना आहे की, या संघटनेने हिंदू संस्कृतीला नव चैतन्य दिलं आहे. त्यामुळे आपल्या घरातला एक मुलगा या संघात असावा'.

बागेश्वर बाबा यांनी छत्रपती शिवाजी महाराजांवरही वादग्रस्त वक्तव्य केलं. या वक्तव्यावरही मुख्यमंत्र्‍यांनी भाष्य केलं. 'महापुरुषांविषयी अनेक लोककथा तयार होतात. वेगवेगळ्या लोककथा तयार होता. रामायणामध्येही लोककथा आहेत. परिस्थितीवर अवलंबून राहिल्याने कथा तयार होत असतात. त्यामुळे जो इतिहास आपण शिकलो. उपलब्ध असलेल्या कोणत्याही ग्रंथात अशा प्रकारचा कोणताही दाखला नाही'.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update : ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी धुळ्यात विरोधकांचा मोर्चा

Kitchen Hacks : पाण्याने खरंच ओळखता येतं का नकली पनीर? जाणून घ्या पद्धत

Pune Crime: पुणे हादरले! आयटी इंजिनिअरसोबत भयंकर घडलं, नवऱ्यासह ५ जणांवर गुन्हा

Garba Hairstyles: गरबा दांडियासाठी ट्राय करा 7 ट्रेंडी हेअरस्टाईल, ट्रेडिशनल लूकला येईल मॉडर्न टच

CNG car mileage: 1 किलो CNG मध्ये कार किती किलोमीटर्स धावते?

SCROLL FOR NEXT