Shruti Vilas Kadam
मेथीचे दाणे रात्रभर पाण्यात भिजवून सकाळी त्याची बारीक पेस्ट तयार करा. ही पेस्ट स्कॅल्प आणि केसांच्या मुळांवर लावता येते.
मेथीचे दाणे खोबरेल तेलात हलके गरम करून तयार केलेले तेल थंड झाल्यावर स्कॅल्पवर मसाज करण्यासाठी वापरता येते.
मेथीची भिजवलेली पेस्ट केसांच्या मुळांना लावल्याने केसांची निगा राखण्यास मदत होऊ शकते. मात्र, केसगळतीची अनेक कारणे असल्याने हा उपचार सर्वांसाठी परिणामकारक असेलच असे नाही.
मेथीची पावडर किंवा पेस्ट यामध्ये दही किंवा अंडे मिसळून हेअर पॅक तयार करता येतो. हा पॅक साधारण ३० मिनिटे ठेवून केस धुता येतात.
मेथीचा वापर केसांच्या कंडिशनिंगसाठी घरगुती पद्धतीने केला जातो. त्यामुळे केस अधिक मऊ आणि चमकदार दिसण्यास मदत होऊ शकते.
मेथीचे दाणे, तांदूळ आणि लवंग पाण्यात रात्रभर भिजवून त्यापासून हेअर मास्क तयार करण्याची पद्धतही वापरली जाते.
मेथी किंवा इतर घरगुती घटक प्रत्येकाच्या स्कॅल्पला सूट होतीलच असे नाही. त्यामुळे प्रथम थोड्या भागावर पॅच टेस्ट करा. खाज, लालसरपणा किंवा जळजळ झाल्यास वापर टाळा.