

गडचिरोलीच्या जपतलाई निवासी आश्रमशाळेत सर्पदंशाची दुर्दैवी घटना.
सहा विद्यार्थिनींना सर्पदंश; तीन विद्यार्थिनींचा मृत्यू झाला.
इतर तीन विद्यार्थिनींवर उपचार सुरू आहेत.
गडचिरोली जिल्ह्यातील निवासी आश्रमशाळेत घडलेल्या अत्यंत दुर्दैवी घटनेने संपूर्ण राज्य हादरले. धानोरा तालुक्यातील जपतलाई निवासी आश्रम शाळेत सर्पदंशाने तीन विद्यार्थिनींचा मृत्यू झाल्याने खळबळ उडाली आहे. आश्रमशाळेत झोपलेल्या 6 विद्यार्थींना एकाचवेळी सर्पदंश झाला. त्यामध्ये, तीन विद्यार्थींनींचा मृत्यू झाला असून तीन विद्यार्थिनींवर उपाचर सुरू आहेत.
या दुर्दैवी आणि संतापजनक घटनेचे पडसाद आज मंत्रालयात उमटल्याचं दिसून आले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीआश्रमशाळेची पाहणी करणाऱ्या अधिकाऱ्यास निलंबित करण्याचे आदेश दिलेत. आश्रमशाळेतील तीन मुलींचा मृत्यू झाल्याची बाब गंभीर असल्याचे सांगत आदिवासीमंत्र्यांनी संताप व्यक्त केला. काँग्रेसचे मारोतराव कोवासे यांच्यासारखे तीनवेळा आमदार, एकदा खासदार राहिलेले नेते आश्रमशाळा असे चालवत असतील. लहान मुलींच्या सुरक्षेशी खेळत असतील, तर ते कसे माफ करणार? असा सवाल आदिवासी मंत्र्यांनी मंत्रिमंडळ बैठकीत विचारला. दरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही या घटनेनंतर कारवाईचे आदेश दिलेत.
संबंधित आश्रमशाळेत शिक्षक नाही, वॉर्डन नाही, तर शासकीय अनुदान घेत असतानाही सुविधा देत नाही. त्यामुळे, या आश्रमशाळेची ज्या अधिकाऱ्याने तपासणी केली आणि अहवाल दिला, त्याला निलंबित करा, असे आदेश मुख्यमंत्री फडणवीसांनी दिले. रस्त्यावरच्या आश्रमशाळांची केवळ पाहणी करू नका, अंतर्गत भागातील आश्रमशाळांची सुद्धा नियमित तपासणी करा. तसेच संबंधित आश्रमशाळेचा परवाना कायमस्वरूपी रद्द करा, असेही आदेश मुख्यमंत्र्यांनी दिलेत.
गडचिरोलीतील धानोरे येथील निवासी आश्रमशाळेत विद्यार्थिनी जेवणानंतर झोपलेल्या असताना रात्री विद्यार्थिनींना सर्पदंश झाल्याची घटना समोर आली. या घटनेनंतर विद्यार्थिनींना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र धानोरा रुग्णालयात उपचारादरम्यान इयत्ता सहावीतील दीपिका लकडा आणि इयत्ता आठवीतील सुष्मिता मंडल या दोन विद्यार्थिनींचा मृत्यू झाला. तर गडचिरोलीच्या जिल्हा रुग्णालयात उपचार घेत असलेल्या इयत्ता दुसरीतील अनु कोरेटी हिचाही मृत्यू झाला होता.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.