मोठी बातमी! उद्धव ठाकरे मध्यरात्री मुख्यमंत्र्यांना भेटल्याचा दावा; संजय राऊत काय म्हणाले?

Sanjay raut News : उद्धव ठाकरे मध्यरात्री मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना भेटल्याचा दावा करण्यात आला आहे. या दाव्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. यावर संजय राऊतांनी बोलण्यास नकार दिलाय.
Sanjay raut News update
Sanjay raut newsSaam tv
Published On
Summary

राजकीय घडामोडींना वेग

उद्धव ठाकरे मध्यरात्री मुख्यमंत्र्यांना भेटल्याचा प्रबुद्ध भारतचा दावा

कथित भेटीवर संजय राऊतांची प्रतिक्रिया

राजकीय वर्तुळात आताची सर्वात मोठी बातमी हाती आली आहे. उद्धव ठाकरे मध्यरात्री मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना वर्षा बंगला निवासस्थानी भेटल्याचा दावा प्रबुद्ध भारत मीडिया हाऊसनं केला आहे. मुख्यमंत्र्यांच्या 'वर्षा' या शासकीय निवासस्थानी ठाकरे-फडणवीसांची भेट झाल्याचा दावा करण्यात आलाय. या कथित भेटीबाबत खासदार संजय राऊत यांनी बोलण्यास नकार दिला आहे.

Sanjay raut News update
राजकारणात उलथापालथ होणार, एकनाथ शिंदे ठाकरेंचे ८ खासदार फोडणार? संजय राऊतांनी मोजक्या शब्दात विषय संपवला

खासदार संजय राऊत यांनी आज माध्यमांशी संवाद साधला. राऊतांनी यावेळी विविध घडामोडींवर भाष्य केलं. राऊत यांनी यावेळी ठाकरे-फडणवीसांच्या कथित भेटीच्यावर दाव्यावर बोलण्यास नकार दिला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरे यांच्या भेट झाली का, यावर प्रतिक्रिया दोन नेतेच देऊ शकतात. माझ्याकडे माहिती असली तरी तुम्हाला का सांगू. राजकारणात आणखी बऱ्याच गोष्टी घडणार आहेत. मी आता कशाला सांगू. आता बोलून त्यावर पाणी कशाला ओतायचं? असा प्रश्न उपस्थित करत राऊतांनी प्रतिक्रिया दिली.

'आप'च्या फूटीवरही संजय राऊत यांनी भाष्य केलं. संजय राऊत म्हणाले, 'राघव चड्डा आणि खासदार भाजपमध्ये गेले. भाजप राजकारण करत आहे. त्यांच्या राजकारणाला निर्लज्ज एकच शब्द आहे. चड्डा हे याआधी भाजपला गुंडाची पार्टी बोलत होते. अचानक भ्रष्टाचाराकडे कसे गेले. बकासूराची भूक मिटत नाही. यांची पार्टी बकासूरासारखी आहे. भाजपची भूक मिटतच नाही. त्यांच्यावर पक्ष सोडायला दबाव होता. आम्ही पक्ष सोडला नाही. ज्यांच्याकडे जास्त पैसे आहेत, ते घाबरतात, अशी टीका संजय राऊत यांनी केली आहे.

Sanjay raut News update
Sharad Pawar News: राज्यातील उद्योग दुसरीकडे घेऊन जाण्याचा प्रयत्न होतोय, शरद पवारांचा सत्ताधाऱ्यांवर गंभीर आरोप

शिवसेना पक्षाच्या सुनावणीबाबतही संजय राऊत यांनी भाष्य केलं. 'सुनावणी पुढे जात आहेत. उद्धव ठाकरे दुःखी आहेत. संविधानाची हत्या झाली आहे, यामध्ये न्यायव्यवस्था जर बघत नसेल, तर बागेश्वर धाममध्ये जावून न्याय मागावा लागेल. त्यांना वकील म्हणून कोर्टात घेऊन जावं लागेल. एवढं काय महत्त्वाचं काम आहे की तारखांवर तारखा पडत आहेत. उद्धव ठाकरे वारंवार म्हणताहेत की काही तर भूमिका घेतली पाहिजे. मात्र सध्या त्यांनी संयम ठेवला आहे. पण संयमाचा एकदा विस्फोट होईल.

विधानपरिषदेच्या निवडणुकीबाबत राऊतांनी म्हटलं की, घोडेबाजार विरोधीपक्ष करत नाही. ज्यांच्याकडे प्रचंड पैसा आणि सत्ता आहे ते विकत घेतात'.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com