Sharad Pawar News: राज्यातील उद्योग दुसरीकडे घेऊन जाण्याचा प्रयत्न होतोय, शरद पवारांचा सत्ताधाऱ्यांवर गंभीर आरोप

Sharad Pawar News: राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार,शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे आणि काँगेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या उपस्थितीत पुस्तक प्रकाशनचा कार्यक्रम पार पडला.
Sharad Pawar News
Sharad Pawar Newssaam tv
Published On

आवेश तांदळे

Sharad Pawar News:

'काही जण म्हणतात मुंबई महाराष्ट्रापासून घेऊन जातील, पण असेच काहीच होणार नाही. काही जण राज्यातील उद्योग दुसऱ्या राज्यात घेऊन जाण्याचा प्रयत्न होतोय हे मात्र खरं आहे, असं वक्तव्य राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी केलं. ते सकाळ वृत्तपत्राचे संपादक राहुल गडपाले लिखित 'अवतरणार्थ' पुस्तक प्रकाशनाच्या कार्यक्रमात बोलत होते. (Latest Marathi News)

सकाळ वृत्तपत्राचे संपादक राहुल गडपाले लिखित 'अवतरणार्थ' या पुस्तकाचे प्रकाशन मुंबईत पार पडलं. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार,शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे आणि काँगेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या उपस्थितीत पुस्तक प्रकाशनचा कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमात राम मंदिराच्या मुद्द्यावर भाष्य करताना शरद पवार म्हणाले, 'आता तारीख जाहीर करत आहेत, राममंदिर तारीख जाहीर केली. मात्र राज्यकर्ते हाच मुख्य विषय आहे असं समोर आणत आहे.' ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Sharad Pawar News
Maharashtra Politics: ग्रामपंचायत निवडणुकीत कुणाची बाजी? सर्वाधिक जागा जिंकल्याचा भाजपचा दावा; कॉंग्रेसने उडवली खिल्ली

उद्धव ठाकरे काय म्हणाले?

'अवतरणार्थ' पुस्तकाच्या प्रकाशनातील कार्यक्रमात बोलताना उद्धव ठाकरे यांनी सत्ताधाऱ्यांवर जोरदार टीका केली. 'आतापर्यंत सगळा अंधार पसरला म्हणून काही लोक बोलत नाही. वणवा पेटला तर काय होते, सगळ्यांना माहीत आहे. चौथा स्तंभाला वाळवी लागली आहे. सध्या ईडीस कारभार चालला आहे. पहिलं हिडीस वागणं म्हणायचे आता ईडीस कारभार सुरू आहे, अशी टीका ठाकरे यांनी केली.

'मेरा अमरावतीसे बहुत पुराना नाता है'. मी उगाच फेकाफेकी करणार नाही. माझं अमरावतीबरोबर खरंच नाते आहे. निर्लज्जाला कधीच निर्भीड होता येत नाही. बाळासाहेबांचा फोटो चोरून पक्ष चालवत आहेत, त्याने निर्भीड होता येत नाही, असे उद्धव ठाकरे पुढे म्हणाले.

'मी मुख्यमंत्री होणार नव्हतो, पण शरद पवार यांनीच मला मुख्यमंत्री केले. आम्ही काँग्रेससोबत गेलो तर शिवसेना काँग्रेसची झाली, असे काही जण म्हणतात. आम्ही 30 वर्ष भाजपसोबत होतो. तेव्हा भाजप झाली नाही, तर आता काय होईल. मी हिंदुत्व सोडले नाही. भाजप आणि आमचे हिंदुत्व वेगळे आहे, असे ठाकरेंनी स्पष्ट केले.

नाना पटोले काय म्हणाले?

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले म्हणाले, 'सध्या आमच्या तिघांना कोणी बोलवत नाही. मग त्यांच्या मागे ईडी लागते. ग्रामपंचायत निवडणुकीचा निकाल लागलाच नाही, पण इकडे चॅनलमध्ये महायुती आघाडीवर दिसत होते. त्यांनी यादी जाहीर करावी, त्यांनी एकदा निवडणुका घ्या, मग त्यांना कळेल, ते कुठे आहेत. माध्यम सध्या दबावात आहेत. वात्सव लिहिले तर नोकरी जाते किंवा ईडी लागते'.

'चौथ्या स्तंभाला संपवत आहेत. आमचे सरकार आले तर आमच्या विरोधात लिहित राहा. आजच्या सरकारमध्ये त्यांच्याविरोधात काही लिहिले तर ईडी लागते. मुंबईत मराठी घर सुद्धा मिळतं. पंतप्रधान मुंबईत येऊन डायमंड मार्केट घेऊन गेले. राज्यातील उद्योग गुजरातमध्ये आणि तिथलं ड्रग्स महाराष्ट्रात, अशी टीका पटोले यांनी सत्ताधाऱ्यांवर केली.

Sharad Pawar News
Manoj Jarange: 'अंतरवालीच्या हल्ल्याची SIT चौकशी करा'; मनोज जरांगे यांची राज्य सरकारकडे मागणी

राहुल गडपाले काय म्हणाले?

'मी जिथे २० वर्ष काम केलं. त्याचे मी शिक्षण घेतलं नाही. पत्रकारांनी प्रश्न विचारण्यासोबत उत्तर पण शोधलं पाहिजे. पहिले आम्ही सांगत तसे सरकार पळत असे, हल्लीच्या काळात सकाळी संजय राऊत किंवा इतर पक्षाचे प्रवक्ते सांगतात तसे पत्रकार पळत आहे. राजकीय भूमिका मांडत असताना गांधी चालत नाही, सध्या तो देशात प्रयत्न सुरु आहे. गेल्या काही दिवसांत इतिहासाची तोडमोड सुरू आहे. यामुळे भविष्यात आपले खूप नुकसान होईल, असे सकाळचे संपादक राहुल गडपाले म्हणाले.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com