Manoj Jarange: 'अंतरवालीच्या हल्ल्याची SIT चौकशी करा'; मनोज जरांगे यांची राज्य सरकारकडे मागणी

Manoj Jarange: अंतरवालीच्या हल्ल्याची SIT चौकशी करा, अशी मागणी मनोज जरांगे यांनी सरकारकडे केली.
Manoj Jarange: 'अंतरवालीच्या हल्ल्याची SIT चौकशी करा'; मनोज जरांगे यांची राज्य सरकारकडे मागणी
Published On

Manoj Jarange News:

राज्यात मराठा आरक्षणाचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. मनोज जरांगे यांनी मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र द्यावे, अशी मागणी केली आहे. मराठा आरक्षणाचा मुद्दा तापला असताना बीड दौऱ्यादरम्यान छगन भुजबळ यांनी मराठा आंदोलक मनोज जरांगे यांच्या वक्तव्यावर भाष्य केलं. त्यानंतर मनोज जरांगे यांनी त्यांच्या वक्तव्याला प्रत्युत्तर देताना अंतरवालीतील हल्ल्यामागे षडयंत्र आहे. त्यामुळे अंतरवालीच्या हल्ल्याची SIT चौकशी करा, अशी मागणी मनोज जरांगे यांनी सरकारकडे केली. (Latest Marathi News)

मनोज जरांगे काय म्हणाले?

'आता काही जण शांततेत आंदोलन करीत आहेत, त्यांना अडकवले जात आहेत. त्यात आता आम्ही आमचं आरक्षण मागत आहेत. आमचंच आरक्षण आम्हाला द्या असं आम्ही म्हणत आहोत, असे ते म्हणाले. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Manoj Jarange: 'अंतरवालीच्या हल्ल्याची SIT चौकशी करा'; मनोज जरांगे यांची राज्य सरकारकडे मागणी
Chhagan Bhujbal News: ओबीसींची मते तुम्हाला नकोय का? भुजबळांचा थेट सत्ताधाऱ्यांना सवाल

'अंतरवालीत आधी पोलिसांवर हल्ला करण्यात आला. त्यानंतर पोलिसांनी लाठीचार्ज केला', या आरोपाला उत्तर देताना ते म्हणाले, 'आता ते षडयंत्र आहे, हे जनतेने समजले आहे. कारण त्यांना जनतेशी देणंघेणं नाही. याबाबत उच्चस्तरीय चौकशी करा. लाठीहल्ल्याची चौकशी करा. त्यावेळी पोलिसांवर दडपण होतं का, १५ दिवस आधीच्या चौकशी करा. सर्व पोलिसांची उच्चस्तरीय चर्चा करा. आरोप चुकीचा ठरला तर आरोप करण्यावर काय कराल? असा सवालही जरांगे यांनी केला.

'मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र मिळणार आहे. ते आम्ही मिळवणारच. दबावाखाली प्रमाणपत्र मिळत नाहीये. हे आमचं हक्काचं आरक्षण आहे. आमचं घर हरवलं, त्याच्या नोंदी आता सापडल्या आहेत. ओबीसी बांधव हे मराठा बांधवाविरोधात बोलणार नाहीत. ओबीसी बांधवांना जाणीव आहे की, त्यांना गोरगरीब मराठा बांधवांना आरक्षण मिळालं पाहिजे, असेही ते म्हणाले.

Manoj Jarange: 'अंतरवालीच्या हल्ल्याची SIT चौकशी करा'; मनोज जरांगे यांची राज्य सरकारकडे मागणी
Gram Panchayat Result: ग्रामपंचायत निवडणूक निकालानंतर CM शिंदेंची पहिली प्रतिक्रिया, उद्धव ठाकरेंना टोला

'ओबीसी बांधवांर अन्याय होतो, तेव्हा त्यांच्याकडे कोणी गेलं नाही. आमच्या नोंदी सापडत असेल तर कुणबी प्रमाणपत्र द्यायला काही हरकत नसावी. संदीप क्षीरसागर यांचं घर जाळण्याचं समर्थन केलं नाही, असेही त्यांनी स्पष्ट केलं.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com