अकोल्यात जिवलग मित्रानेच केली मित्राची हत्या! Saam Tv
महाराष्ट्र

अकोल्यात जिवलग मित्रानेच केली मित्राची हत्या!

अकोल्यातील सिव्हिल लाईन पोलीस ठाणेच्या हद्दीत येणाऱ्या शास्त्री नगर परिसरातील भाडेकरू असलेल्या मुलाने आपल्याच रूममेटची गळा आवळून हत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

जयेश गावंडे

अकोला : अकोल्यातील सिव्हिल लाईन Civil line पोलीस ठाणेच्या हद्दीत येणाऱ्या शास्त्री नगर परिसरातील भाडेकरू असलेल्या मुलाने आपल्याच रूममेटची गळा आवळून हत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. दोघेही खाजगी कोचिंगसाठी अकोल्यात Akola रूममेट म्हणून राहत होते. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे. Close friend killed his friend

प्रतीक लवंगे असे मृतकाचे नाव असून, आरोपी व मृतक दोघेही बुलढाणा Buldhana जिल्ह्यातील रहिवासी असल्याची प्राथमिक माहिती पोलिसांनी Police दिली आहे. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, सिव्हील लाईन पोलीस ठाणे अंतर्गत येणाऱ्या शास्त्रीनगर Shastrinagara परिसरातील एका घरात भाड्याच्या खोलीत बुलढाणा जिल्ह्यातील दोन अल्पवयीन मुले नीट परीक्षेच्या तयारीकरिता राहायला आले होते.

हे देखील पहा-

हे दोघेही जीवलग मित्र असल्याने, एकाच खोलीत भाड्याने राहत होते. 17 जून रोजी कुठल्या तरी कारणावरून आपसात वाद झाला आणि या वादातच प्रतीक लवंगे या युवकाची त्याच्या मित्राने गळा आवळून हत्या केल्याचे समोर आले आहे. या प्रकरणी सिव्हिल लाईन पोलिसांनी हत्येचा गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे. Close friend killed his friend

मृतक Dead आणि आरोपी दोघेही शिक्षणात हुशार होते. अभ्यास सुरू असतानाच यातील एका टॉपिक वरून दोघात वाद झाला असल्याचे कळते. हा वाद एवढा शिगेला पोहचला की हत्या घडून आली. मृतकाला रुग्णवाहिकेतून नेत असताना, आरोपी देखील सोबत होता. पोलिसांचा संशय बळावल्याने अल्पवयीन आरोपीला ताब्यात घेवून चौकशी करून गुन्हा दाखल करण्यात आला आहे . दरम्यान या घटनेमुळे खाजगी कोचिंग साठी आलेल्या मुलांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

सिव्हिल लाईनचे सहाय्यक पोलिस निरीक्षक योगेश वाघमारे या प्रकरणाचा तपास करीत आहे. अनैसर्गिक कृत्यास नकार दिल्याने ही घटना घडल्याचे पोलिसांनी सांगितले आहे. पोलिस तपासात आणि खून करणाऱ्या मुलाच्या जबाबातून ही घटना समोर आली आहे. खून करणाऱ्या अल्पवयीन मुलास पोलिसांनी न्यायालयात court हजर केले होते. न्यायालयाने त्याला बालसुधारगृहात पाठविले आहे. Close friend killed his friend

Edited By- Digambar Jadhav

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maratha-OBC Quota Row: ओबीसी नेते लक्ष्मण हाकेंविरोधात पोलिसात तक्रार दाखल; काय आहे कारण?

Chandra Grahan Tips : ग्रहणाच्या वेळी अन्न दूषित होऊ नये यासाठी सोपा उपाय

Anant Chaturdashi 2025 live updates : श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मिरवणूक रथात विराजमान

Viral Video: शाळा आहे की मसाज पार्लर! शिक्षकाने विद्यार्थिनींकडून करून घेतली बॉडी मसाज, VIDEO पाहून तुम्हालाही येईल राग

Aayush Komkar: शेवटी सूड घेतलाच! वनराजच्या अंत्यविधीला शस्त्रपूजन करत बदला घेण्याची शपथ, अन् १ वर्षाने आयुष कोमकरची हत्या

SCROLL FOR NEXT