CM Deevndra fadanvis  Saam TV News Marathi
महाराष्ट्र

राजकीय वर्तुळात खळबळ! मुख्यमंत्र्यांच्या विश्वासू नेत्याला भाजपने उमेदवारी नाकारली, शिलेदाराने दिला राजीनामा

Nagpur Municipal Corporation BJP ticket controversy : नागपूर महानगरपालिका निवडणुकीत भाजपकडून उमेदवारी नाकारल्याने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे विश्वासू देवदत्त डेहनकर यांनी पक्षाच्या सक्रिय सदस्यत्वाचा राजीनामा दिला. नागपूरच्या राजकारणात मोठी खळबळ.

Namdeo Kumbhar

पराग ढोबळे, नागपूर प्रतिनिधी

Devdatta Dehankar resignation from BJP Nagpur : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे नागपूरमधील विश्वासू असलेले देवदत्त डेहनकर यांना भाजपने उमेदवारी नाकारली आहे. देवदत्त नागपूर महानगरपालिकेतून निवडणुकीच्या रिंगणात उतरण्यासाठी उत्सुक होते. त्यासाठी त्यांनी तयारीही केली होती. पण सोमवारी रात्री ऐनवेळी त्यांची उमेदवारी नाकारण्यात आली. भाजपने उमदेवारी नाकारल्यानंतर देवदत्त डेहनकर यांनी पक्षाच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला. देवदत्त यांच्या राजीनाम्याची नागपूरच्या राजकारणात जोरदार चर्चा सुरू आहे.

नागपूर महानगरपालिका निवडणुकीत भारतीय जनता पक्षाकडून तिकीट नाकारल्याने देवदत्त डेहनकर नाराज झाले. त्यांनी सोशल मीडियावरून भाजपच्या सक्रिय सदस्तवाचा राजीनामा दिला. तसेच भाजपच्या अनेक ग्रुपवर मॅसेज टाकून नाराजी व्यक्त केल्याचे समोर आले आहे. एकीकडे जागावाटपाचा तिढा सुटलेला नसताना भाजपमधील अंतर्गत नाराजी उफाळून आली आहे. देवदत्त डेहनकर यांच्या राजीनाम्यामुळे नागपूरच्या राजकीय वर्तवळात खळबळ उडाली आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दक्षिण पश्चिम विधानसभा मतदारसंघातील प्रभाग क्रमांक 36 मधून देवदत्त डेहनकर हे उमेदवारीसाठी इच्छुक होते. ते मागील काही दिवसांपासून प्रभाग मध्ये सक्रियपणे उमेदवारी मिळेल या अनुषंगाने कामही करत होते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या जवळचे मानले जाणारे देवा डेहनकर यांनी अचानकपणे प्रभाग क्रमांक 36 मधून दुसऱ्याला उमेदवारी मिळाल्याच्या कारणावरून नाराजी व्यक्त करत सक्रिय सदस्य पदाचा राजीनामा दिल्याची माहिती आहे.

भाजपकडून आता हा राजीनामा स्वीकारला जाईल की त्यांची मनधरणी केल्या जाईल, हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही. त्यामुळे भाजपचे पदाधिकारी देवा डेहनकर नाराजी दूर करण्यात यशस्वी होतं का हे सुद्धा पहावं लागणार आहे. देवा डेहनकर यांनी पक्षाच्या सर्वच पदाचा राजीनामा दिलाय. देवदत्त डेहनकर हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या जवळचे समजले जातात. मागील अनेक वर्षांपासून ते युवा मोर्चा आणि भाजपच्या माध्यमातून पक्ष वाढीसाठी काम करत होते. तिकीट नाकारल्याने त्यांनी राजीनामा दिला आहे. याचा भाजपला फटका बसू शकतो, असे नागपूरमधील काही भाजप कार्यकर्त्यांनी सांगितले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Tejas Vs Vande Bharat : वंदे भारत,तेजस, शताब्दी की गतिमान एक्सप्रेस; कोणत्या ट्रेनचं तिकीट सर्वाधिक? वाचा सविस्तर

Maharashtra Live News Update : नवी मुंबईत भाजप शिवसेना स्वबळावर लढणार

Thalapathy Vijay: जन नायकन! थलापथी विजयचा ३३ वर्षांच्या फिल्मी करिअरला रामराम, पूर्णवेळ राजकारणात होणार सक्रिय

Accident : उत्तरखंडमध्ये भयंकर अपघात, बस दरीत कोसळली, ७ जणांचा मृत्यू

PM Khaleda Zia : बांग्लादेशवर शोककळा! पहिल्या महिला पंतप्रधान खालिदा झिया यांचे निधन

SCROLL FOR NEXT